गोंदिया : बालाघाट, भंडारा-गोंदिया जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात आढळणाऱ्या सारस पक्ष्यांचे अस्तित्त्व न्यायालयाच्या सुचनेनंतरही धोक्यात आले आहे. सेवा संस्था आणि वनविभागाने जून महिन्यात केलेल्या गणनेत महाराष्ट्रातील भंडारा-गोंदिया जिल्ह्यात ३५ आणि लगतच्या बालाघाट जिल्ह्यात फक्त ४९ सारस पक्ष्यांची नोंद झाली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत या पक्ष्यांच्या संख्येत २ ने घट झाली आहे. विशेष म्हणजे, घरट्यांच्या संख्येतही गोंदिया जिल्ह्यात सातत्याने घट होताना दिसून येत आहे. सारस संर्वधनासाठी वन्यजीव संस्था आणि वन विभागाने पुढाकार घेण्याची गरज व्यक्त होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

गेल्या तीन वर्षाचा विचार केल्यास सातत्याने सारस पक्ष्यांची संख्या कमी होताना दिसून येत आहे. १८ जून रविवारला करण्यात आलेल्या सारस गणनेनुसार महाराष्ट्र राज्यात ३५ तर मध्यप्रदेशात ४९ सारस पक्षी आढळले. मागच्यावर्षीच्या तुलनेत गोंदिया जिल्ह्यात ३ सारस कमी झाले तर भंडारा जिल्ह्यात १ व मध्यप्रदेशातील बालाघाट जिल्ह्यात ४ सारसांची संख्या वाढली आहे. गोंदिया जिल्ह्यात सारस संख्या कमी होणं चिंतेची बाब ठरली आहे. सारस बचावाकरीता न्यायालयाने निर्देश दिल्यानंतरही मागील वर्षीच्या तुलनेत सारस पक्ष्यांची कमी झालेली संख्या प्रशासनाच्या नियोजनातील अभाव दर्शवणारी ठरली आहे.

हेही वाचा >>>मान्सून दाखल होऊनही विदर्भात पेरण्या खोळंबलेल्याच; ‘ही’ आहेत कारणे

उपवनसंरक्षक कुलराजसिंग, उपवनसंरक्षक राहुल गवई, सहायक वनसंरक्षक प्रदीप पाटील, सहायक वनसंरक्षक राजेंद्र सदगीर, सेवा संस्थेचे अध्यक्ष सावन बहेकार तथा सारस संरक्षण प्रकल्प प्रभारी सेवा संस्था सदस्य यांच्या मार्गदर्शनाखाली गोंदिया आणि बालाघाट जिल्ह्यातील एकूण १००-१२० ठिकाणी सारस गणना करण्यात आली. गोंदिया व बालाघाट जिल्ह्यात संस्थेचे सदस्य, स्थानिक शेतकरी व गोंदिया, बालाघाट येथील वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी यांनी गणना केली.बाघ व वैनगंगा नदी महाराष्ट्रातील गोंदिया तसेच मध्यप्रदेशातील बालाघाट जिल्ह्याला विभाजित करते. भौगोलिक दृष्टीकोणातून नदीच्या दोन्ही बाजूला जैवविविधतेत समानता पाहिली जाते. सारस पक्ष्यांना भ्रमंतीकरिता किंबहुना विश्रांतीकरिता हे स्थळ योग्य आहे. म्हणूनच जिल्ह्यात सारस पक्ष्यांचा अधिवास टिकून आहे. परंतु अधिवासाच घरटेसुद्धा कमी होऊ लागल्याच यावळी समोर आल आहे.वर्षभरातील सारस पक्ष्यांचे विश्रांतीस्थळ, प्रजनन अधिवास तथा भोजनासाठी प्रयुक्त भ्रमण याचा अभ्यास केला गेला. संरक्षणासाठी शेतकरी आणि स्वयंसेवी संस्थांसह प्रशासकीय पातळीवर विशेष प्रयत्न करण्याची गरज असल्याचे सेवा संस्थेचे अध्यक्ष सावन बहेकार यांनी सांगितले.