लोकसत्ता टीम
नागपूर : शहरातील सर्वाधिक गजबजलेले ठिकाणांमध्ये धरमपेठचे नाव दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यामुळे धरमपेठकडे जाणाऱ्या रस्त्यावर नेहमी नागरिक आणि वाहनांची वर्दळ असते. धरमपेठमध्ये पोहचायचे असेल तर काही रस्त्याने जाणे टाळा किंवा पर्यायी मार्गाचा वापर करा. अन्यथा नक्कीच वाहतुकीच्या कोंडीत अडकाल.
पोलीस आयुक्त आणि वाहतूक शाखेच्या पोलीस उपायुक्तांनी शहरातील काही ठराविक रस्त्यावरील वाहतुकीत बदल केले आहेत. काही रस्त्यांवरील वाहतूक दुसऱ्या रस्त्याकडे वळती केली आहे तर काही रस्त्यावर दुरुस्तीचे काम सुरु आहे. सध्या शहरातील सर्वच उड्डानपुल बंद आहेत. त्यामुळे शहरातील अनेक मार्गावर वाहतुकीची कोंडी निर्माण झाली आहे. त्यामुळे काही रस्ते गजबजलेले असून तासनतास वाहतूक कोंडीत अडकण्याची शक्यता आहे.
आणखी वाचा-संक्रांतीच्या दिवशी सोन्याच्या दरात मोठी उसळी, असे आहेत आजचे दर…
सीताबर्डीतून धरमपेठकडे जात असाल तर थेट अमरावतीकडे जाणाऱ्या मार्गाचा वापर करा. अंबाझरी-रविनगराकडूनही अमरावतीकडे जाणाऱ्या मार्गाचा वापर करू शकता. लक्ष्मीनगरातून धरमपेठकडे जायचे असेल तर सेंट्रल मॉल किंवा ट्रॅ्फीक चिल्ड्रेन पार्ककडून जाणे टाळा. त्या रस्त्यावर सध्या वाहनांची गर्दी आहे. महालमधून जर धरमपेठ गाठायचे असेल तर नक्कीच मेयो रुग्णालय-रेल्वे स्थानकाजवळील रस्त्याचा वापर करा. पर्यायी मार्गावर खूप मोठी गर्दी आहे. कोराडी-मानकापूरकडून धरमपेठमध्ये यायचे असेल तर थेट आरबीआय चौकातून जीपीओ चौकाकडील रस्त्याचा वापर करा.
सीताबर्डीकडून येण्याचा विचार करत असाल तर नक्कीच वाहतुकीच्या कोंडीत अडकू शकता. अजनी-रामेश्वरी किंवा तुकडोजी चौकाकडून धरमपेठला जायचे असेल तर नक्कीच अजनी रेल्वेस्थानकासमोरील रस्त्याचा वापर करा. जनता चौक आणि व्हीएनआयटी चौकातून थेट धरमपेठला विना वाहतूक कोंडीत अडकता पोहचू शकता. प्रतापनगर-खामल्याकडून जर धरमपेठला जायचे असेल तर अंबाझरी तलाव किंवा शंकरनगर चौकातून जाऊ शकता.