नागपूर: उपराजधानीत उन आणि थंडीचा खेळामुळे तापमानात वारंवार बदल होत आहे. या बदलामुळे शहरात श्वसन विकाराचे रुग्ण वाढले आहेत. दिवाळीत फटाक्यांमुळे वायू प्रदुषणात वाढ होऊन हे रुग्ण वाढण्याचा धोका आहे. योग्य काळजी घेतल्यास हे आजार टळू शकतात, असे मत क्रिम्स रुग्णालयाचे संचालक व सुप्रसिद्ध श्वसनरोग तज्ज्ञ डॉ. अशोक अरबट म्हणाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दिवाळीता सन उत्साहात साजरा करण्यासाठी हल्ली घराघरात स्वच्छता, रंगरंगोटीसह इतरही कामे सुरू आहे. दिवाळी घराघरात दिवे, अगरबत्ती लावण्यासह फटाके फोडले जातात. हे करतांना कुणाला त्रास होणार नाही, म्हणून काळजी घ्यायला हवी. अन्यथा फटाकेसह इतर प्रदुषणामुळे सर्दी- खोकला व दम्याचा त्रास वाढतो. पूर्वापार दमा व श्वसनविकार असलेल्यांनी स्वत:चा विकार वाढू नये म्हणून जास्च काळजी घ्यावी.

दरम्यान कारखाणे व इंडस्ट्रीज्, मोठी मोठी बांधकामं यामुळे कणांचे प्रदुषण वाढते. फुफ्फुसांच्या आरोग्यासाठी हे हानीकारक आहे. दिवाळीच्या फटाक्यांमुळे होणाऱ्या वायुप्रदुषणाचा त्रासही अनेकदा होऊ शकतो. दिवाळीच्या फटाक्यांमुळे त्वचेला आणि कानांना त्रास होतो. सोबतच घसा खवखवणे, डोळ्यात पाणी येणे कानात बधीरता येणे, अंगावर खाज येणे अशी लक्षणे देखील उद्भवू शकतात.

हेही वाचा… अमरावती-पुणे, बडनेरा-नाशिकदरम्‍यान ३६ उत्‍सव विशेष रेल्‍वेगाड्या

फटाक्यांमधून निघणाऱ्या धुरात सल्फरडाय ऑक्साईड, कार्बन मोनोऑक्साईड, नायट्रस ऑक्साईड आणि अन्य विषारी असतात. त्यामुळे सर्दी- खोकला, दमा, सीओपीडी, इंटरस्टेशियल लंग्स डिसिज, ज्यांना कोविड होऊन गेलाय असे रुग्ण, कोविड फायब्रोसिसचे रुग्ण, अशा फुफ्फुसाची व श्वासांशी संबंधीत रुग्णांना या धुराचा त्रास होतो. त्यामुळे त्यांनी तर जाणीवपूर्वक या धुरापासून दुर रहावे, असेही डॉ. अरबट म्हणाले. याशिवाय घराला रंग देताना त्यात वापरण्यात येणाऱ्या द्रव्यामधून विशिष्ट प्रकारचा वायु निघतो. त्यामुळे देखील श्वसनाच्या समस्या उद्भवतात, असेही त्यांनी सांगितले.

“जेव्हा ऋतू बदलतो, तेव्हा आपल्या शरीराला त्या वातावरणाशी समरस होण्यास वेळ लागतो. त्या वेळेसही श्वसनाशी संबंधीत आजार बळावतात. दम्यासह व्हायरल फिवर, ताप, अंगदुखी, सर्दी यांचेही प्रमाण वाढते. लहान मुलांवर व ज्येष्ठ नागरिकांवर त्याचा अधिक परिणाम पडतो. अशा वेळी प्रतिबंधात्मक उपाय करून विकार होऊ नये म्हणून काळजी घ्यायला हवी.”

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: There is a risk of increasing patients with respiratory disorders in diwali due to air pollution nagpur mnb 82 dvr
Show comments