वाशीम : वाशीम आणि बुलढाणा जिल्ह्याच्या सिमेलगत पेनगंगा नदीच्या तिरावर ४ हजार लोक संख्येचे गोहोगाव हाडे गाव आहे.मात्र, गावाजवळून गेलेल्या नदीवर पूल नसल्याने गावातील लहान मुले, महिला आणि विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून दररोज जीवघेणा प्रवास करावा लागत आहे.
देशाला स्वातंत्र्य मिळून ७६ वर्ष लोटली. सध्या सर्वत्र स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जात असला तरी नागरिकांना मूलभूत गरजा पासून वंचित रहावे लागत आहे. रिसोड तालुक्यातील गोहोगाव हाडे येथून वाशीम -बुलडाणा जिल्ह्याना जोडणारा आंतर जिल्हा मार्ग केवळ दोन किलोमीटर अंतरावर सोनाटी गावाला जोडणारा रस्ता असतांना पेनगंगा नदीपात्रातून तब्बल १० महीने पाण्यातून या ग्रामस्थांना व शाळकरी विद्यार्थांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहेत. या गावातील आजारी रुग्ण,गर्भवती महीलांना प्रचंड अडचणीचा सामना करावा लागत आहे. विद्यार्थांना जवळचा रस्ता नसल्या कारणाने दर दिवसी सकाळ सायंकाळ त्याच्या पालकांना अक्षरशः नदी ओलांडून ये-जा करावी लागत आहे. आशी अवस्था तब्बल दहा महीणे राहत असून. या पेनगंगा नदीवर पुल नसल्यामुळे कित्येक गर्भवती महीलेचे प्राणा हि गेलेत. मात्र स्वातंत्र्याचे ७६ वर्ष पुर्ण झाले तरी या ग्रामस्थांच्या रस्त्याचा प्रश्न अद्याप पर्यंत मार्गी लागला नसल्याची विदारक परिस्थिती आहे.
हेही वाचा >>>देशातील कापूस उत्पादनात यंदा आठ टक्के घट; ‘कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया’चा दुसरा अहवाल जाहीर
पूल द्या अन्यथा मतदानावर बहिष्कार
पुला अभावी गेल्या अनेक वर्षा पासून ग्रामस्थांना विविध अडचणीचा सामना करावा लागत आहे. वेळेत उपचार न मिळाल्याने अनेकांना प्राण गमवावे लागले. जवळ शेती असून देखील कसण्यासाठी जीवघेणा संघर्ष तीनशे फूट पाण्यातून करावा लागत आहे. मात्र याकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे आता तरी प्रशासनाने या नदीवर पूल बांधून रस्ता उपलब्ध करून द्यावा, अन्यथा येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्यात येईलं असा इशारा येथील ग्रामस्थांनी दिला आहे.
तीनशे फूट नदीपात्रातून आई-वडिलांना मुलांना खांद्यावर घेऊन दररोज या गळाभर पाण्यातून सोनाटी या गावी जाण्यासाठी प्रवास करावा लागतो याचा मोठा त्रास आम्हाला सहन करावा लागतो शासनाने लवकरात लवकर बंधारा किंवा पुलाची निर्मिती करावी जेणेकरून आम्हाला रस्ता उपलब्ध होईल.-विकस हाडे, सरपंच गोहोगाव