तुर्कस्तानमधील भूकंप संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेत आहे. भुकंपाच्या छायाचित्र बघितल्यावर तर ही आपल्या आजूबाजूला तर घडली नाही ना असे वाटावे इतपत जवळची वाटते. त्यामुळेच भूकंप नागपूर, विदर्भात झाला तर अशी भीती मनला स्पर्श करून जाते. नागपूरला भूकंप मापकाचे मध्य भारतातील केंद्रीय कार्यालय आहे. त्यांच्या माहितीनुसार नागपूरला भूकंपाचा धोका नाही. पण यापूर्वी शहर सौम्य धक्क्यांनी हादरल्याच्या नोंदी आहेत.

हेही वाचा- नागपूर : राष्ट्रीय लोकअदालतमध्ये २७ हजार प्रकरणे तडजोडीने निकाली

maharashtra assembly election 2024 traffic diversions in pune city on occasion of pm modi visit
पंतप्रधानांच्या दौऱ्यानिमित्त शहरात वाहतूक बदल; स. प. महाविद्यालय परिसरातील रस्ते वाहतुकीस बंद
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Khed Parshuram Ghat accident, Khed Parshuram Ghat,
खेड परशुराम घाटात दाट धुक्यामुळे चार वाहनांचा विचित्र अपघात; वाहनांचे मोठे नुकसान तर जीवितहानी टळली
washim assembly constituency dispute within mahayuti
महायुतीमध्ये असंतोषाची दरी, बंडखोरीमुळे वाशीम जिल्ह्यात वाद वाढले; कारवाईत पक्षपातीपणा?
vip roads for ordinary pune residents
लोकजागर : सामान्य पुणेकरांना ‘व्हीआयपी’ रस्ते मिळतील का?
apmc premises free from traffic jams due to measures taken by the traffic police
एपीएमसी परिसर वाहतूक कोंडीमुक्त; वाहतूक पोलिसांच्या उपाययोजनांमुळे नागरिकांना दिलासा
ambrishrao Atram Aheri, Aheri, BJP Aheri,
अहेरीत अम्ब्रीशराव आत्रामांना भाजपचा छुपा पाठिंबा? बंडखोरीनंतरही पक्षाकडून कारवाई नाही
Loksatta explained The quality of coal in power generation plants is deteriorating
विश्लेषण: वीजनिर्मिती प्रकल्पातील कोळशाचा दर्जा खालावतो आहे?

नागपूरलगत शेजारच्या मध्यप्रदेश, आंध्र, तेलंगणाच्या काही भागात भूकंप प्रवण क्षेत्रात मोडतो, भूकंप तीव्रतेबाबतज्ञपूर्ण देश चार झोनमध्ये विभागला गेला आहे. भारतीय मानक ब्युरोने तयार केलेल्या भारताच्या भूकंपीय क्षेत्रीय नकाशावरज्ञ भारताच्या एकूण ~५९% भूभाग (भारतातील सर्व राज्यांचा समावेश होतो) प्रवण आहे भूकंपाच्या दृष्टीने सर्वात प्रवण प्रदेश पाचव्या, तर सर्वात कमी शक्यत असलेले प्रदेश दुस-या झोनमध्ये येतात. महाराष्ट्रात या पूर्वी मराठवाड्यात प्रलयंकारी भूकंप झाला. मात्र विदर्भ, नागपूर भूकंप प्रवण क्षेत्रात मोडत नाही. असे असले तरी पूर्व विदर्भाला लागून असलेल्या मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश आणि तेलंगणाचा काही भाग भूकंप प्रवण क्षेत्रात मोडतो. त्यामुळे नागपूरला भूकंपाचा धोका नसला तरी लगतच्या पाचशे किलोमीटरवरील भागात टांगती तलवार आहेच. नागपूरमध्ये अलीकडच्या काळात २०१७ व २०२० मध्ये भूकंपाचे सौम्य धक्के अनुभवले. ऑक्टोबर २०२० मध्ये बसलेल्या धक्क्यांची तीव्रता रिश्टर स्केलमध्ये ३.३ तीव्रतेची नोंदवली गेली होती