नागपूर : राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांमध्ये मोठ्या संख्येने विषबाधेचे रुग्ण उपचाराला येतात. परंतु, एकाही रुग्णालयात या विषाचा प्रकार शोधणारी ‘टॉक्लिकोलॉजिकल स्क्रिनिंग’ तपासणी उपलब्ध नाही. त्यामुळे डॉक्टरांना उपचारात अडचणी येतात. ही तपासणी उपलब्ध झाल्यास विषबाधेच्या मृत्यूचे प्रमाण कमी होणे शक्य आहे.

राज्यात कौटुंबिक कारणांसह इतरही कारणांनी विविध विष प्राशन करून होणाऱ्या आत्महत्यांची संख्या मोठी आहे. या रुग्णांना अत्यवस्थ अवस्थेत शासकीय रुग्णालयात हलवले जाते. नागपुरातील मेडिकल रुग्णालयात रोज सुमारे या पद्धतीचे विविध विष प्राशन केलेले २ ते ३ रुग्ण उपचाराला येतात. मेयो रुग्णालयासह राज्यातील इतरही रुग्णालयात ही स्थिती आहे. तज्ज्ञ डॉक्टरला या रुग्णाने नेमके कोणते विष घेतले हे वेळीच कळल्यास उपचाराचे अचूक व्यवस्थापन करण्यास मदत होते. त्यानुसार रुग्णाच्या औषधांचा प्रकार व मात्रा ठरवता येते. परंतु, राज्यातील नागपूर, मुंबईसह इतर एकाही शासकीय रुग्णालयात या पद्धतच्या रुग्णाने सेवन केलेल्या विषाचा अचूक प्रकार शोधणारी ‘टॉक्सिकोलॉजिकल स्क्रिनिंग’ तपासणीच उपलब्ध नाही. त्यामुळे तज्ज्ञ डॉक्टर निवडक तपासणीच्या संशोधनासह अनुभवाच्या जोरावर उपचार करतात.

Symptoms and Treatment of Guillain-Barré Syndrome in Pune
Guillain-Barre Syndrome Pune: पुणेकरांना पिण्याच्या पाण्याबाबत पालिका आयुक्तांचं ‘हे’ आवाहन; जीबीएसचा उल्लेख करत म्हणाले…
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
number of Guillain Barre Syndrome GBS patients in state has reached 101 of which 16 patients are on ventilators
‘जीबीएस’ग्रस्त गावांना शुद्ध पाणी कठीणच? वाढीव कोटा मंजूर नसल्याने प्रश्न; महापालिका-जलसंपदा विभागात वाद
103 water samples in Buldhana district contaminated government lab report
बुलढाणा : १०३ जलनमुने दूषित, शासकीय प्रयोगशाळांचा अहवाल
suspect arrested for inciting girl doctor suicide
डॉक्टर तरुणीस आत्महत्येस प्रवृत्त करणारा अटकेत; नवी मुंबईत सांगलीतील डॉक्टर ताब्यात
Role of government in public health
आरोग्य व्यवस्था ही सरकारचीच जबाबदारी! 
Vasai Virar Municipal Solid Waste Management Project marathi news
‘पैसे नाहीत, असे कसे म्हणता?’, महाराष्ट्र सरकारला सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
beggar murder news in Pune,update in marathi
पुण्यातील लष्कर भागात भिक्षेकऱ्याची मारहाण करुन हत्या

आणखी वाचा-भाजपची नागपूर ते कोल्हापूर इलेक्शन स्पेशल ट्रेन

प्रत्येक शासकीय वैद्यकीय महाविद्यलयातील न्यायवैद्यकशास्त्र विभागात एमएससी न्यायवैद्यकशास्त्र विषयाची तज्ज्ञांचे मनुष्यबळ व तंत्रज्ञ उपलब्ध करून ही तपासणी शक्य आहे. त्यामुळे विषबाधेच्या मृत्यूचे प्रमाण कमी करता येते. परंतु शासन लक्ष देत नसल्याने ही तपासणीच उपलब्ध होत नाही. त्यामुळे राज्यभरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांत या तपासण्या केव्हा उपलब्ध होणार? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

मृत्यूनंतर मात्र तपासणी

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात जिवंतपणी विष प्राशन केलेला अत्यवस्थ रुग्ण आल्यास ‘टॉक्सिकोलॉजिकल स्क्रिनिंग’ तपासणीची सोय नसल्याने विषाचा प्रकार कळू शकत नाही. परंतु, रुग्ण दगावल्यास या रुग्णालयात जमा केलेले नमुने न्यायालयीन प्रक्रियेसाठी पोलीस न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळेत घेऊन जातात. येथे तपासणीतून या विषाचा प्रकार माहीत केला जातो. त्यामुळे मृत्यूनंतर मात्र या विषाचा प्रकार माहीत केला जातो. त्यातही या प्रयोगशाळेवरील कामाचा ताण बघता बऱ्याच तपासणीचे अहवाल बऱ्याच महिन्यांनी पोलिसांना मिळत असल्याचे या क्षेत्राचे जाणकार सांगतात.

आणखी वाचा-दलित समाजात अस्वस्थता; भाजपच्या ‘चार सौ पार’च्या घोषणेने संविधान बदलाची चर्चा

शासकीय रुग्णालयांना मर्यादा आहेत. प्रत्येक शासकीय रुग्णालयांत ही तपासणी उपलब्ध करून खासगीत तपासणीची मुभा दिल्यास अनेकांचे प्राण वाच शकतात. -डॉ. इम्रान नुरमोहम्मद, अध्यक्ष, इंडियन सोसायटी ऑफ क्रिटिकल केअर मेडिसीन, नागपूर शाखा.

Story img Loader