नागपूर : राज्यात १० ऑगस्टपर्यंत पावसाचा अंदाज असला तरी कुठेही तीव्र हवामानाचा अंदाज नाही. येत्या तीन ते चार दिवस हलका ते मध्यम पाऊस असणार आहे. राज्यात जुलै महिन्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला होता. ऑगस्ट महिन्यात मात्र पावसाने अनेक ठिकाणी विश्रांती घेतली आहे.
हेही वाचा – पावसाळ्यात घरात व अंगणात कुठली झाडे लावावीत? काय आहे या मागचे शास्त्र वाचा…
ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासून राज्यात पावसाने अनेक भागांत विश्रांती घेतली. यापूर्वी जुलै महिन्यात कोकण आणि विदर्भात झालेल्या अतिवृष्टीमुळे हाहाकार माजला होता. ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासून पावसाचा जोर कमी होऊ लागला. गेल्या चार, पाच दिवसांपासून पावसाने राज्यातील अनेक भागांत दडी मारली आहे.