नागपूर: राज्यात अजूनही पेरणीयोग्य पाऊस नाही. त्यामुळे शेतकरी अजूनही प्रतीक्षेत आहे. तर दुसरीकडे हवामान खात्याने कोकण विभागाला रेड अलर्ट दिला आहे. येत्या चार आठवड्यांच्या अंदाजानुसार कोकण विभाग वगळता इतर विभागांमध्ये मोठ्या प्रमाणात पावसाची शक्यता नाही. राज्यामध्ये जुलैमध्ये सरासरीइतका पाऊस पडण्याची माहिती भारतीय हवामान खात्यातर्फे देण्यात आली आहे. राज्यामध्ये अजूनही ३० टक्के पावसाची तूट आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जुलैमधील पावसाचा अंदाज

भारतीय हवामान विभागाने गुरुवारी ६ जुलैला जारी केलेल्या पुढील चार आठवड्यांच्या पूर्वानुमानानुसार ७ ते १३ जुलै, १४ जुलै ते २० जुलै, २१ जुलै ते २७ जुलै या काळात कोकणामध्ये चांगला पाऊस असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. ७ ते १३ जुलै या आठवड्यात मध्य महाराष्ट्रामध्ये तसेच विदर्भात काही ठिकाणी पाऊस अनुभवता येईल. मात्र १४ ते २० जुलै या कालावधीत बहुतांश महाराष्ट्रात फारसा पाऊस नसेल असे आत्ताच्या पूर्वानुमानावरून स्पष्ट होत आहे. २१ ते २७ जुलैच्या आठवड्यात मात्र पूर्ण राज्यात पावसाचे अस्तित्व असू शकेल. त्यानंतर २८ जुलै ते ३ ऑगस्ट या आठवड्यात पुन्हा पावसाचे प्रमाण खालावण्याची शक्यता आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: There is still no rainfall suitable for sowing in the maharashtra rgc 76 dvr
Show comments