बुलढाणा : सिंदखेड राजा तालुक्यातील साखरखेर्डा येथील शेख आदिल हत्याप्रकरणी काल रात्री मोठा ‘राडा’ झाला! आरोपीला अटक करण्याच्या मागणीसाठी पोलीस ठाण्यावर संतप्त जमावाने धडक दिल्यावर पोलिसांनी सौम्य लाठीमार केला. या प्रकरणी २१ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. दंगल नियंत्रण पथकासह जिल्ह्यातील वरिष्ठ पोलीस अधिकारी दाखल झाले असून, सध्या गावाला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. गावात तणावपूर्ण स्थिती आहे.

यापूर्वी १३ एप्रिलच्या रात्री साडेआठच्या सुमारास साखरखेर्डा येथील जाफ्राबाद मोहल्ल्यातील गवंडीची सुतगिरणी परिसरात शेख आदिल याची गळा आवळून हत्या करण्यात आली. पोलिसांनी एका आरोपीला अटक करून खुनाचा गुन्हा दाखल केला. मात्र यावर पीडित कुटुंबाचे समाधान झाले नाही. काल, १४ एप्रिलला दुपारी मृताचा दफनविधी पार पडला. त्यानंतर रात्री साडेदहाच्या सुमारास संतप्त नातेवाईक पोलीस ठाण्यावर धडकले. यावेळी पोलिसांनी जमावावर सौम्य लाठीमार केला.

Gujarat gold chain snatchers thieves active in vasai
गुजरातमधील सोनसाखळी चोर वसईत सक्रीय, गुन्हे प्रकटीकरण शाखेकडून अटक
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Mokka crime fugitive arrested from Karnatak Pune news
Pune Crime News: मोक्काच्या गुन्ह्यातील फरारीला कर्नाटकातून अटक
Mira Road Riot Case, Bail to 14 Muslim Youths,
मीरा रोड दंगल प्रकरण : १४ मुस्लिम तरुणांना उच्च न्यायालयाकडून जामीन
ghatkopar billboard collapse case, High Court,
घाटकोपर फलक दुर्घटना : आरोपी भावेश भिंडेचा जामीन रद्द करा, सत्र न्यायालयाच्या आदेशाला सरकारचे उच्च न्यायालयात आव्हान
villagers rescue accused as well as cop falls into well In sangamner taluka
पुढे आरोपी, मागे पोलीस पाठलागाचा थरार ! आरोपी पाठोपाठ पोलीसही पडला विहिरीत
senior citizen cheated , Crime case against cyber thieves,
पुणे : अटकेची भीती दाखवून ज्येष्ठाची फसवणूक, सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा
Kurkheda youths cutting cakes with swords during curfew case filed by police
गडचिरोली : वाढदिवशी तलवारीने केक कापणाऱ्यांना पोलिसांचा हिसका

हेही वाचा – गोंदिया : ना, ना करत पटोलेंनीही धरला ठेका; भीम ज्योती रॅलीत कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर केला डान्स, एकदा पहाच..

या प्रकरणी साखरखेर्डा पोलिसांनी शेख अजर शेख अफसर (३३), साजीदखान सलीमखान पठाण ( २६), शेख समीर शेख रौफ ( ३०), अजहर शेख हनिफ (२५ ),  शेख सिकंदर शेख रफिक (२५), साबीर हुसेन लायक हुसेन (३२), अजीम खान शरीफखान पठाण (४०), मोहम्मद रफीक मोहम्मद शेफीक (३०),  शेख अरशद शेख अफसर (२९ ),  शेख सांडु शेख कादर( ४३), फैजानखान मुजमीलखान ( २४), शेख आवेश शेख शकील (२३), शेख अनिस शेख चांद (३५), शेख सोहील शेख अकील ( २१ ), मुक्तार मास्तर (४५), एजाज मास्तर (४३), अयुब कुरेशी ( ४०), शेख नइम शेख अयुम (४०), शेख शकी ( ४५), अशपाक शहा मुनीरशहा ( ४५), शेख शकील शेख शफी (४२), सर्व रा. साखरखेर्डा यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचा भंग केला यावरून २१ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

काय आहे प्रकरण?

१३ एप्रिलला रात्री शेख आदिल शेख अकिल (१७) व प्रशांत गवई (रा. सावंगी भगत) या दोघांचे क्षुल्लक कारणावरून भांडण झाले. यावेळी प्रशांतने आदिलचा गळा आवळला. आदिल हा जागेवर बेशुद्ध पडला. त्याला चिखली येथे नेत असताना वाटेत त्याची प्राणज्योत मालवली. दरम्यान, रात्री उशिरा पोलिसांनी प्रशांत यास अटक केली.

हेही वाचा – “८० टक्के समाजकारण करा, राजकारण करण्याची गरजच पडणार नाही”, नितीन गडकरींचा ‘मौलिक’ सल्ला

वरिष्ठ दाखल

मात्र शुक्रवारी रात्री उशिरा शंभर ते दीडशे जणांच्या संतप्त जमावाने पोलीस स्टेशन गाठले. पोलिसांनी परिस्थिती हाताबाहेर जात असल्याने सौम्य लाठीमार केला. दंगल नियंत्रण पथकासह बुलढाण्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन कदम, मेहेकरचे उपविभागीय पोलीस अधिकारी विलास यामावार, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक लांडे घटनास्थळी दाखल झाले.

Story img Loader