लोकसत्ता टीम

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नागपूर : भंडारा जिल्ह्यातील जवाहरनगर येथील ऑर्डीनेस फॅक्टरीमध्ये गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात (२७ जानेवारी) भीषण स्फोट झाला होता. बरोबर एक वर्षांनी पुन्हा ही फॅक्टरी स्फोटाने हादरली.

आज सकाळी साडेदहाच्या सुमारास झालेल्या एका शक्तिशाली स्फोटामुळे कारखान्याचे छत कोसळले. त्यात १३ ते १४ कामगार अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. त्यातील पाच जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे. तर सहा जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. यापूर्वी गेल्या वर्षी २७ जानेवारीला सकाळी साडे आठच्या सुमारास झालेल्या भीषण स्फोटात एका कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला होता. कारखान्यातील ‘सी एक्स’ विभागात हा स्फोट झाला आहे. मृतकाचे नाव अविनाश मेश्राम आहे. सी एक्स हा केमिकलचा एक विभाग आहे. अविनाश मेश्राम आज सकाळी पहिल्या शिफ्टमध्ये कामाला आले होते. ही शिफ्ट सकाळी ६ वाजता सुरू होते. त्यांनी काम सुरू केल्यानंतर अडीच तासात ही घटना घडली. स्फोट होताच ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये एक गोंधळ उडाला. आग विझवण्यासाठी फॅक्टरीचे अग्नीशमन दल सरसावले आणि लगेच आग आटोक्यात आणली. पण, एका कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला होता.

आता पुन्हा भीषण स्फोट झाला. यामध्ये आतापर्यंत चार कामगारांचे मृतदेह सापडले आहे. त्यांचे नावे चंद्रशेखर गोस्वामी (५९ वर्षे ), मनोज मेश्राम (५५ वर्षे ), अजय नागदेवे (५१ वर्षे ) आणि अंकित बारई (२० वर्षे ) यांचा समावेश आहे. तर जखमींमध्ये एन पी वंजारी (५५ वर्षे ), संजय राऊत( ५१ वर्ष ), राजेश बडवाईक (३३ वर्षे ), सुनील कुमार यादव( २४ वर्षे ), जयदीप बॅनर्जी (४२ वर्षे ) यांचा समावेश आहे. छत कोळल्याने त्यात कामगार अडकलेले आहेत. नेमकी किती कामगार त्यात अडकले हे अद्याप समजले नाही. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात येत आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: There was an explosion at jawaharnagar ordnance factory in january last year rbt 74 mrj