वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील साखळी नजीक हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावर वाहनासाठी उन्नत मार्गाचे (व्हेईकूलर ओव्हरपास) चे काम सुरू असताना पूल कोसळल्याचे वृत्त निराधार असून क्रेनच्या सहाय्याने गर्डर वर उचलत असताना क्रेन ऑपरेटरच्या चुकीमुळे क्रेन घसरून गर्डर पूर्ण वर चढण्यापुर्वीच खाली कोसळले, असे स्पष्टीकरण महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अमरावती शिबीर कार्यालयाच्या मुख्य अभियंत्यांनी दिले आहे.
हेही वाचा – चंद्रपूर : …अन् काही क्षणातच अख्खे घर झाले जमीनदोस्त; १०० फूट खोल खड्डा
काम करताना सुरक्षिततेची पूर्ण काळजी घेण्यात आली होती. तथापि दुर्दैवाने क्रेन घसरल्याने अपघात झाला. अपघाताच्या ठिकाणी कोणतीही जीवित वा वित्तहानी झाली नसून काम पूर्ववत सुरू करण्यात आल्याचे रस्ते विकास महामंडळाचे म्हणणे आहे.