नागपूर: महाराष्ट्रातील बदलत्या राजकीय परिस्थितीत शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी एकत्र यावे, अशी इच्छा व्यक्त करणारा फलक शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी नागपुरात लावला आहे.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
रेशीमबाग चौकात शिवसेनेच्या (ठाकरे गट) कार्यालयापुढे हा फलक लावण्यात आला असून त्यावर ‘ हीच ती वेळ मराठी माणसाला न्याय देण्यासाठी उद्धव व राज ठाकरे यांनी एकत्र येण्याची गरज. आता तरी एकत्र या’ असे लिहीले आहे. फलकावर बाळासाहेब ठाकरे ,उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचे छायाचित्रे आहेत. ठाकरे गटाचे कार्यकर्ते दीपक पोहणेकर यांच्यासह इतर काही कार्यकर्त्यांची त्याव नावे आहेत. शिवसेनेकडून हा फलक लागल्याने त्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे.
First published on: 07-07-2023 at 11:02 IST
Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: There were signs in nagpur asking raj thackeray and uddhav thackeray to come together now cwb 76 amy