अकोला : नागपूर विभागातील राजनांदगाव – कळमना रेल्वे विभागादरम्यान कन्हान स्थानकात तांत्रिक कामामुळे दक्षिण पूर्व मध्य रेल्वेकडून ‘नॉन इंटरलॉकिंग ब्लॉक’ घेण्यात येत आहे. या कामासाठी रेल्वे वाहतुकीवर परिणाम होणार आहे. अकोला मार्गे धावणाऱ्या अनेक गाड्यांच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.
गाडी क्र. १२८७० हावडा-सीएसएमटी मुंबई साप्ताहिक एक्सप्रेसची ०८ डिसेंबर, १२८६९ सीएसएमटी मुंबई-हावडा साप्ताहिक एक्सप्रेसची १० डिसेंबरची फेरी रद्द राहील. २२९०५ ओखा-शालिमार एक्सप्रेस १० डिसेंबर, २२९०६ शालिमार-ओखा एक्सप्रेस १२ डिसेंबर, १२८१२ हटिया-एलटीटी (मुंबई) एक्सप्रेस ०८ आणि ०९ डिसेंबर, १२८११ एलटीटी (मुंबई)-हटिया एक्सप्रेस १० आणि ११ डिसेंबर, १३४२५ मालदा टाउन सुरत एक्सप्रेस ०२ आणि ०९ डिसेंबर, १३४२६ सुरत-मालदा टाउन एक्सप्रेस ०४ आणि ११ डिसेंबर रोजी रद्द राहील. १२१०१ एलटीटी(मुंबई)-शालिमार एक्सप्रेस ०८, ९, ११ आणि १२ डिसेंबर, १२१०२ शालीमार-एलटीटी (मुंबई) एक्सप्रेस १०, ११, १३ आणि १४ डिसेंबर रोजी रद्द राहील.
२०८२३ पुरी – अजमेर ट्रेन सेवा ०४, ०७ आणि ११ डिसेंबर, २०८२४ अजमेर-पुरी ट्रेन सेवा ०७, १२ आणि १४ डिसेंबर रोजी रद्द राहील. २०८२२ संत्रागाची-पुणे हमसफर एक्सप्रेस ०९ डिसेंबर रोजी व २०८२१ पुणे – संत्रागाची हमसफर एक्सप्रेस ११ डिसेंबर रोजी रद्द राहील. यामुळे रेल्वे प्रवाशांची चांगलीच अडचण होणार आहे.