नागपूर : जुलै महिन्याच्या अखेरपर्यंत महाराष्ट्रात जोरदार पाऊस बरसला. ऑगस्ट महिन्यात बऱ्याच भागातून पावसाने उसंत घेतली. राज्यात आता काही ठिकाणी हलक्या सरी कोसळताहेत, पण जोरदार पावसाची अजूनही प्रतिक्षाच आहे. भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार राज्यामध्ये १८ ते २४ ऑगस्ट दरम्यान पाऊस पडण्याची शक्यता आहे. या आठवड्यात मराठवाडा आणि विदर्भातील वेगवेगळ्या ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच अनेक जिल्ह्यांमध्ये विश्रांती घेत असलेला पाऊस पुन्हा पडायला सुरुवात होईल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

२५ ते ३१ ऑगस्ट दरम्यान पुन्हा महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. या आठवड्यामध्ये कोकण आणि विदर्भामध्ये पावसाची शक्यता आहे. मात्र, मध्य महाराष्ट्र तसेच मराठवाड्यात सरासरी इतका किंवा त्याहीपेक्षा कमी पावसाचे प्रमाण राहण्याची शक्यता हवामान खात्याने सांगितली आहे. पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र आणि दक्षिण भारतामध्ये पावसाचे प्रमाण १३ ते १७ ऑगस्टदरम्यान अत्यल्प पाऊस राहील.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: There will be heavy rain in maharashtra according to the weather forecast rgc 76 ysh
Show comments