लोकसत्ता टीम
नागपूर: उपराजधानीत लग्न समारंभ वा लग्नाच्या स्वागत समारंभात वर-वधूच्या भेटवस्तूच पळवणारे चोरटे सक्रिय झाले आहेत. हे चोरटे स्वत:ला वर-वधूचे नातेवाईक भासवतात. उमरेड रोडवरील कान्हा सेलिब्रेशन लॉनमध्ये नुकताच चोरट्याने सुमारे दीड लाखांचा मुद्देमाल लंपास केला.
पोलिसांच्या माहितीनुसार माजी सैनिक व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे वरिष्ठ लिपिक लक्ष्मण उराडे यांचा मुलगा मृणाल उराडे याचे लग्न झाले असून स्वागत समारंभ संध्याकाळी उमरेड रोडवरील कान्हा सेलिब्रेशन लॉनमध्ये आयोजित करण्यात आला होता. समारंभात मेडिकलच्या अधिष्ठात्यांपासून वैद्यकीय व इतर क्षेत्रातील अधिकारी व नातेवाईकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली.
आणखी वाचा- नागपूर: वाहतूक कोंडी करणाऱ्या तब्बल बाराशे वाहनांवर कारवाई
रात्री १० ते १०.३० पर्यंत पाहुण्यांनी वर-वधूला सुमारे २०० ते २५० लिफाफ्यात रोखीने तर काहींनी विविध महागड्या भेटवस्तू दिल्या. या सगळ्या वस्तू एका पिशवीत ठेवण्यात आल्या. ही पिशवी सांभाळणारी लक्ष्मण उराडे यांची पुतणी आयुषीजवळ एक नातेवाईक आले. त्यांच्याशी आयुषी बोलत असतानाच एका आकाशी रंगाचा जॅकेट घातलेल्या तरुणाने शिताफीने बॅग घेऊन बाहेरचा रस्ता धरला. थोड्याच वेळात आयुषीच्या निदर्शनास बॅग जागेवर नसल्याचे पुढे आले. त्यापूर्वीच हा तरुण तेथे आलेल्या चारचाकी वाहनात बसून तेथून पसार झाला. हा सर्व प्रकार एका कॅमेऱ्यात कैद झाला, दरम्यान लक्ष्मण उराडे यांनी तेथील पोलीस ठाणे गाठत तक्रार दिली. पोलिसांनाही चलचित्रात आरोपीचा चेहरा दिसल्याचे उराडे यांचे म्हणणे असून चोरटा पोलिसांच्या हाती केव्हा लागणार, याकडे उराडे कुटुंबीयांचे लक्ष लागले आहे.