लोकसत्ता टीम

अमरावती: सध्‍या शाळा, महाविद्यालयांना सुट्या, लग्‍नसराईचे दिवस असल्‍याने येथील मध्‍यवर्ती बसस्‍थानक परिसरात प्रवाशांची प्रचंड गर्दी होत आहे. चोरट्यांसाठी हे सुगीचे दिवस ठरू लागले आहेत. बसस्‍थानकावरून दोन महिलांच्‍या पर्समधून चोरट्यांनी लाखो रुपयांचे दागिने लंपास केल्‍याची घटना समोर आली आहे.

Case registered against school cashier for embezzling Rs 16 lakh Pune news
शाळेतील रोखपाल महिलेकडून १६ लाखांचा अपहार; लोणी काळभोर पोलिसांकडून गुन्हा दाखल
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Thieves , jewellery stolen, Sankranti ,
पुणे : संक्रातीच्या दिवशी चोरट्यांचा धुमाकूळ, महिलांकडील दागिने चोरीला
Dombivli citizen theft caught loksatta
डोंबिवलीत चोरी करत असताना चोरट्याला नागरिकांनी पकडले
Cash worth Rs 3 lakh stolen from school on Law College Road Pune news
पुणे: विधी महाविद्यालय रस्त्यावरील शाळेतून तीन लाखांची रोकड चोरी
bike thieves arrested loksatta news
कल्याण, नवी मुंबई, डोंबिवलीत मोटार सायकल चोरणारे उल्हासनगरमधून अटक
Gang involved in gold chain and vehicle theft arrested
सोनसाखळी, वाहनचोरी करणारी टोळी उघडकीस; सराईत अटकेत, दोन अल्पवयीन ताब्यात
fir against against five for selling nylon manja
नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्या पाच जणांविरुद्ध गुन्हे

जिल्हा मध्यवर्ती बसस्थानकावरून बसमध्ये चढताना एका महिला प्रवाशाच्या पर्समधील ८८ हजार ६३७ रुपये किमंतीचे सोन्याचे दागिने चोराने लंपास केले. मनीष प्रकाश बंड (३८, रा. खराळा, चांदुररेल्वे) हे पत्नीसोबत अमरावती मध्यवर्ती बसस्थानकावर आले होते. त्यावेळी त्यांच्या पत्नीने जवळील ८८ हजार ६३६ रुपये किमंतीचे वेगवेगळे सोन्याचे दागिने व काही रोख रक्‍कम रुमालात बांधून पर्समध्ये ठेवली होती. बंड दाम्पत्य बस स्थानकावरून अकोट जाणाऱ्या बसमध्ये चढत होते. दरम्यान गर्दीचा फायदा घेऊन चोराने महिलेच्‍या खांद्यावरील पर्समधून सोन्याचे दागिने लंपास केले. ही बाब लक्षात आल्यानंतर मनीष बंड यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. त्यानुसार पोलिसांनी अज्ञाताविरुध्द गुन्हा नोंदविला.

आणखी वाचा-नागपूर : पोलीस ठाण्यातून चोरटे पळाल्याची अफवा!

दुसऱ्या घटनेत एक महिला त्यांची लहान बहिण व दोन मुलींसह अमरावती जिल्हा मध्यवर्ती बसस्थानकावरून आर्वी ते कुऱ्हा बसमध्ये चढत होती. दरम्यान अचानक महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत तुटली. त्यांनी तत्काळ तुटलेली पोत हॅन्डबॅगमध्ये ठेवली. परंतू त्यानंतर बसमधील गर्दीतून आत जात त्या आसनावर बसल्या. त्यावेळी त्यांना पर्समधील पंधरा हजार रुपये किमंतीची सोन्याची पोत व मोबाईल दिसला नाही. त्यामुळे त्यांनी घटनेची तक्रार शहर कोतवाली पोलीस ठाण्यात नोंदविली.

अमरावती मध्यवर्ती बसस्थानकावर दररोज हजारो प्रवाशांची गर्दी होते. त्यामुळे गर्दीचा फायदा घेऊन खिसेकापू व महिलांचे दागिने चोरणाऱ्यांचे चांगलेच फावत आहे. बसस्थानक परिसरात पोलीस चौकी आहे. तेथे महिला व पुरुष पोलिसांचा बंदोबस्त आहे. तरीसुध्दा चोरट्यांच्‍या कृत्‍याला आळा बसलेला नाही.

Story img Loader