लोकसत्ता टीम
बुलढाणा: जिल्हापरिषदेचे शिक्षक परिवारासह ‘ड्रॉईंग हॉल’ गाढ झोपल्याची संधी हेरून चोरट्यानी ‘बेडरूम’ मधून घरात प्रवेश करून तब्बल साडेतीन लाखांचा मुद्देमाल लंपास केला. नांदुरा शहरात काल रात्री घडलेल्या या घटनेमुळे गुरुजींना गाढ झोप महागात पडल्याची खमंग चर्चा होत आहे.
जिल्हापरिषद च्या शाळेवर शिक्षक म्हणून कार्यरत मुश्ताक अहमद खान हे नांदुरा येथील शाहीन कॉलनी मध्ये राहतात. रात्री जेवण केल्यावर संपूर्ण परिवार समोरच्या समोरच्या हॉल मध्ये झोपले. कुलरच्या गार हवेमुळे सर्व जण गाढ झोपी गेले.
आणखी वाचा- अडते-व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची कोट्यवधींची फसवणूक, ‘शाहू परिवार’ चे थेट पणन संचालकांना साकडे
दरम्यान ही संधी हेरून अज्ञात चोरट्यानी शयनखोलीच्या खिडकीची लोखंडी चौकट अलगद काढून आत प्रवेश केला. कपाटातील सोन्या चांदीचे दागिने व लॅपटॉप मिळून ३ लाख ६३ हजारांचा मोठा हात मारला.या घटनेचा तपास नांदुरा पोलीस करीत आहे.