चोरटे नेहमीच वेगवेगळी शक्कल लढवत असतात. चोरी करताना किंवा केल्यानंतर मागे कोणताही पुरावा शिल्लक राहू नये, याची खबरदारीही घेत असतात. मात्र यवतमाळ तालुक्यातील साकूर या गावी, चोरट्यांनी मुद्देमाल, ऐवज, दुचाकी, मोबाईल आदी साहित्य चोरून पसार झाल्यानंतर ज्याचा मोबाईल चोरी केला, त्या व्यक्तीला चक्क चोरी केल्याचे फोन करून कळविलेसुद्धा.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> नागपूर : आंबटशौकीन वृद्ध डॉक्टरला अश्लील ‘व्हिडिओ कॉल’ पडला १६ लाखांचा ; तरुणीने दिली छायाचित्र प्रसारित करण्याची धमकी

ग्रामीण भागातही चोरटे सक्रिय झाले आहेत. साकूर येथील गजानन सूर्यकार हे कुटुंबीयांसह घरात झोपले असताना दाराची कडी उघडत चोरट्यांनी घरात प्रवेश केला. कपाटातील ३० हजारांची रोख चोरली. नंतर अंगणातील दुचाकी ताब्यात घेतली. जाताना सूर्यकार यांच्या शेजारी राहणाऱ्या साक्षी निंबाळकर यांच्याकडील मोबाइल चोरला. त्यांची दुचाकी नेण्याचाही प्रयत्न केला. मात्र चावी हाती लागली नाही. चोरटे मुद्देमाल घेऊन पसार झाले व पहाटे साक्षी निंबाळकर यांना फोन करून चोरी केल्याची माहिती दिली. चोरट्यांनी नेलेला मोबाइल सुरूच होता, हे विशेष. या प्रकरणी गजानन सूर्यकार यांच्या तक्रारीवरून यवतमाळ ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thieves stole money and jewelery in sakur village of yavatmal taluka amy