लोकसत्ता टीम

चंद्रपूर: एप्रिल महिन्यात कडक उन्हाळा तापतो. मात्र, विदर्भात गेल्या आठ दिवसांपासून वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू आहे. जणू काही पावसाळा सुरू झाला असेच वातावरण आहे. याचा परिणाम उधळीनेदेखील उडून दूर घर करणे सुरू केले आहे.

attack by a wild dog on a deer
‘शेवटी मरण चुकवता येत नाही…’ हरणावर जंगली कुत्र्याचा क्रूर हल्ला; VIDEO पाहून उडेल थरकाप
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
Savlyachi Janu Savli
Video: “आई मला वाचव…”, सारंगचा जीव संकटात? ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेत पुढे काय होणार? वाचा…
Dinosaur, India Dinosaur, Dinosaur Extinction,
भारतातील डायनासोर नामशेष का झाले? समोर आलं महत्त्वाचं संशोधन…
amazing Ukhana for wife
“आला आला वाघ…?” कोल्हापुरच्या रांगड्या नवरदेवाचा बायकोसाठी जबरदस्त उखाणा, VIDEO एकदा पाहाच
Savlyachi Janu Savali
Video: सावली द्विधा मनस्थितीत अडकणार; भैरवीला दिलेले वचन कसे पूर्ण करणार? पाहा ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेचा प्रोमो
AI camera alerts authorities to halt train near Odisha elephant herd averting major accident video viral
अचानक रुळावर आला हत्तींचा कळप अन्….; पुढे जे घडले ते पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही, Video Viral
Leopard attacks Viral Video
‘त्याने लढून स्वतःचा जीव वाचवला…’ घराबाहेरच्या अंगणात बिबट्याने थेट श्वानावर केला हल्ला; VIDEO पाहून उडेल थरकाप

येथील वन्य जीव तथा हवामानाचे अभ्यासक सुरेश चोपणे यांच्या घरासमोर झुडपी जंगलातील उधळी पावसाळा समजून इतरत्र उडून जात आहे. उडत जाणाऱ्या उधळीचा व्हिडीओ स्वतः सुरेश चोपणे यांनी घेतला आहे. पावसाळा सुरू होण्यास विलंब असताना हा बदल अचंबित करणारा आहे, असं अभ्यासकांचे मत आहे.

व्हिडिओ- सुरेश चोपणे

हेही वाचा… नाना पटोलेंच्या गृह जिल्ह्यात सात बाजार समित्यांपैकी सहा ठिकाणी भाजपाचा विजय

वाळवी किंवा उधळी म्हणून मराठीत ओळखली जाणारी ही प्रजाती मुंग्या नसून कीटक प्रजातीत मोडतात. इंग्रजीत त्यांना टरमाईट म्हणतात. भारतात सर्वत्र आढळणारी ही प्रजाती विविध जातीत विभागली आहे. लाकूड खाऊन जगणारे जीव पर्यावरण आणि वन संवर्धन करण्यासाठी अतिशय मोलाची भूमिका पार पाडतात.

हेही वाचा… वर्धा : ‘समृद्धी’वर पुन्हा अपघात; ट्रक उलटला

त्यांचे जमिनीत असलेले घर, वारूळ अतिशय सुंदर आणि वास्तुकलेचा उत्तम नमुना आहे. पावसाळ्यात मादी उधळीना पंख फुटतात आणि त्या दूर उडून जातात. एकदा घराची जागा निवडली की त्यांचे पंख गळून जातात. शहरात रात्री घरात किंवा रस्त्यावर असलेल्या लाईटवर उधळी मोठ्या संख्येने उडताना दिसते. त्या घरात येतात, जागा शोधून घर करण्याचा प्रयत्न करतात. अनेक लोक उधळी येऊ नये म्हणून घराबाहेर रासायनिक कीटकनाशके फवारणी करतात, परंतु उधळी उडून घरात शिरते हे कित्येकांना माहीत नसते.

हेही वाचा.. नागपूर : ब्रिटिश येण्यापूर्वी भारतात सर्वत्र साक्षरता होती; लेखिका साहना सिंह यांचा अजब दावा

आता पावसाळा सुरू झाला असे समजून उधळी इतरत्र उडून जात आहे. पशुपक्षी, कीटक सर्वच नैसर्गिक बदलासाठी संवेदनशील असतात. हवामान बदलामुळे त्याच्या वर्तणुकीत बदल तर येणारच आहे. परंतु त्यांच्या अधिवास आणि परिसंस्थेवरसुद्धा परिणाम होणार आहे. परंतु मानवाच्या विनाशकारी वर्तनात बदल होताना दिसत नाही, असे चोपणे यांचे मत आहे.

Story img Loader