गोंदिया : ईस्ट कोस्ट रेल्वेच्या खुर्दा मार्ग रेल्वे विभागांतर्गत असलेल्या मेरामंडली- हिंदोल मार्ग विभागातील तिसरा व चौथा रेल्वेमार्ग मेरामंडली स्टेशनला ब्लॉक घेऊन जोडण्याचे काम केले जाईल. हे काम १५ ते २४ एप्रिल २०२५ या कालावधीत केले जाणार आहे. ज्या अंतर्गत दक्षिण पूर्व मध्य रेल्वे अंतर्गत गोंदिया रेल्वे स्थानकावरून जाणाऱ्या गाड्यांचे संचालन पूर्णपणे रद्द राहील. त्यामुळे गोंदिया जिल्ह्यातील प्रवासी ज्यांनी खालील रद्द करण्यात आलेल्या एक्सप्रेस गाड्यांचे आगाऊ आरक्षण केलेले आहे त्यांना यामुळे त्रास होणार आहे त्यांना या रद्द करण्यात आलेल्या गाड्यांमधील आपल्या ठरलेल्या प्रवासा करिता पर्यायी व्यवस्था करावी लागणार आहे.

कारण मेरामंडली- हिंदोल रोड विभागातील तिसरा व चौथा रेल्वे मार्ग चे काम १५ ते २६ एप्रिल २०२५ दरम्यान केले जाणार आहे त्यामुळे गोंदिया स्थानकावरून जाणारे काही गाड्यांचे संचालन पुढील १५ एप्रिल ते ३१ एप्रिल पर्यंत रद्द करण्यात आले आहे. या अंतर्गतच १९ एप्रिल रोजी जोधपूरहून सुटणारी ट्रेन जोधपूर-पुरी एक्स्प्रेस रद्द राहील. त्याच प्रमाणे १६ एप्रिल रोजी पुरी हून सुटणारी ट्रेन पुरी-जोधपूर एक्स्प्रेस, आणि १३ एप्रिल रोजी लोकमान्य टिळक टर्मिनल वरून सुटणारी ट्रेन एलटीटी-पुरी एक्स्प्रेस, १५ एप्रिल ला पुरी हून सुटणारी ट्रेन पुरी-एलटीटी एक्स्प्रेस, व गांधीधाम येथून सुटणारी ट्रेन गांधीधाम एक्सप्रेस ही एक्स्प्रेस १३ एप्रिल रोजी सोडली जाणार नाही. २१ एप्रिल रोजी ट्रेन पुरी-गांधीधाम एक्सप्रेस जी पुरी हून सुटते आणि ट्रेन क्रमांक इंदूर-पुरी १५ आणि २२ एप्रिल रोजी इंदूर हून सुटणार नाही, १७ आणि २४ एप्रिल रोजी पुरी हून सुटणारी एक्सप्रेस आणि पुरी-इंदूर एक्सप्रेस ही रद्द राहतील.

तेलंगणा राज्यातून येणारी ट्रेन हैदराबाद- रक्सौल- सिकंदराबाद साप्ताहिक स्पेशल ट्रेन दक्षिण पूर्व मध्य रेल्वे वरून १ जुलैपर्यंतच चालवली जाणार आहे. दक्षिण पूर्व मध्य रेल्वे च्या गोंदिया आणि बिलासपूर स्थानकांवर ट्रेन हैदराबाद-रक्सौल साप्ताहिक विशेष ट्रेन च्या वेळापत्रकात आंशिक बदल करण्यात आला आहे. त्यामुळे ही गाडी गोंदिया स्थानकात ६.५७ ऐवजी ७.०७ वाजता पोहोचेल. तसेच बिलासपूर स्थानकात ११.५० ऐवजी दुपारी १२.१० वाजता पोहोचेल. तर बिलासपूर आणि गोंदिया, राजनांदगाव स्थानकां वरील ट्रेन रक्सौल-सिकंदराबाद साप्ताहिक विशेष ट्रेनच्या वेळापत्रकात आंशिक बदल करण्यात आले आहेत. ही गाडी आता गोंदिया स्थानकात ७.५० ऐवजी ८.१० वाजता पोहोचेल. तसेच राजनांदगाव स्थानकात ९.२८ ऐवजी ९.३० वाजता पोहोचेल. त्याचप्रमाणे, दर सोमवारी चारलापल्ली येथून धावणारी ट्रेन चारलापल्ली-रक्सौल ही विशेष ट्रेन ७ एप्रिल ते ३० जून २०२५ पर्यंत वाढवण्यात आली आहे.

विरुद्ध दिशेने देखील, ट्रेन रक्सौल-चारलापल्ली विशेष ट्रेनचे संचालन दर गुरुवारी रक्सौल येथून धावणारी ट्रेन ची वेळ ३१ जुलै २०२५ पर्यंत वाढविण्यात आली आहे. गोंदिया आणि राजनांदगाव स्थानकांवर चारलापल्ली-रक्सौल विशेष ट्रेनचे टेबल. ही गाडी आता गोंदिया स्थानकात ७.५० ऐवजी ८.१० वाजता पोहोचेल. त्यामुळे ती राजनांदगाव स्थानकात ९.२८ ऐवजी ९.३० वाजता पोहोचेल अशी माहिती दक्षिण पूर्व मध्य रेल्वेचे वाणिज्यिक व्यवस्थापक दिलीप सिंह यांनी दिली पत्रकातून कळविली आहे.