नाताळच्या सुटीत रेल्वेगाड्यांना होणारी गर्दी लक्षात घेता रेल्वेने नागपूरहून मुंबई आणि पुण्यासाठी या काळात ३० रेल्वेगाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. या विशेष गाड्या आठवड्यातून एकदा राहणार असून पुणे-अजनी दरम्यान दहा फेऱ्या होणार आहेत. मुंबई-नागपूर एक्सप्रेस दहा दिवस आणि पुणे-नागपूर एक्सप्रेस देखील दहा दिवस धरणार आहे.
एक विशेष गाडी आज मंगळवारी पुण्याहून नागपूरकरिता निघाली. ही गाडी ३ जानेवारीपर्यंत धावणार आहे. ही गाडी मंगळवारी सायंकाळी ४ वाजून ५० मिनिटांनी अजनीला पोहोचेल. अजनी येथून दर बुधवारी सायंकाळी ७ वाजून ५० मिनिटांनी सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ११.३५ वाजता पुण्याला पोहोचेल.
विशेष गाडी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून मंगळवारी निघाली. ही गाडी ३ जानेवारीपर्यंत धावणार आहे. मुंबई येथून (एलटीटी) दर मंगळवारी सव्वाआठ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी १० वाजून २५ मिनिटांनी नागपूरला पोहोचेल. नागपूहून ही विशेष गाडी येत्या शुक्रवारी दुपारी दीड वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी पावणे चार वाजता लोकमान्य टिळक टर्मिनसला पोहोचेल.
हेही वाचा: दुर्मिळ योग; ८ डिसेंबरला ‘मंगळ’ पृथ्वीच्या जवळ येणार, आणि…
याच काळात धावणारी नागपूर-पुणे विशेष गाडी दर बुधवारी नागपूरहून दुपारी दीड वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी ६ वाजून २५ मिनिटांनी पुण्याला पोहोचेल. ही गाडी पुण्याहून दर गुरुवारी रात्री पावणेअकरा वाजता निघेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे तीन वाजता नागपूरला येईल.