नागपूर : वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक सह्याद्री व्याघ्र राखीव कोल्हापूर अंतर्गत अवैध शिकारी व वन्यप्राण्यांच्या अवयवांच्या चोरट्या व्यापारास आळा घालण्यासाठी वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक सह्याद्री व्याघ्र राखीव, कोल्हापूर अंतर्गत कोल्हापूर वन्यजीव वनवृत्तांमध्ये मेळघाट व्याघ्र प्रकल्प अमरावती प्रमाणे सह्याद्री व्याघ्र प्रकल्प, कोल्हापूरमध्ये सायबर सेल स्थापन करण्यात आला असल्याची माहिती विभागीय वन अधिकारी (वन्यजीव) एस.एस. पवार यांनी दिली.

वन्यजीव व वनगुन्हे यांना आळा घालण्यासाठी संशयित आरोपी यांच्यावरील आरोप सिद्ध होण्यासाठी सी.डी.आर. (call detail Record), एस.डी.आर (subscriber Detail Record), एल.टी.एल. (Live Tower Location), टी.डी.डी (Tower dump data), Caf, (Verification Document) या कार्यालयाकडे अधिकृतपणे मागविण्यात आलेली माहिती गोपनीय पद्धतीने संबंधित मागणी करण्याऱ्या विभागाला पुरविण्यात येणार असून त्याचा फायदा अवैध शिकारी व वन्यप्राण्यांच्या अवयवांच्या चोरट्या व्यापारास आळा घालण्यासाठी तसेच तपास करण्यासाठी वनविभागाकडील क्षेत्रीय कर्मचारी-अधिकारी यांना होणार आहे. सायबर सेलचे उद्घाटन कोल्हापूर सह्याद्री व्याघ्र राखीवचे वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक आर. एम. रामानुजम यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले.

Drone survey of 332 villages in Sangli district
सांगली जिल्ह्यातील ३३२ गांवाचे ड्रोनव्दारे सर्व्हेक्षण; ६७ हजार मिळकतपत्रिका, सनद नकाशे तयार
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
tiger sighted again in barshi fear continues among villagers
बार्शीत वाघाचे पुन्हा दर्शन; गावकऱ्यांमध्ये दहशत कायम
forest fire cases
राज्यात तब्बल १६ हजारांहून अधिकवेळा जंगलाला आग
amravati rain news
अमरावती : थंडीची लाट…! विभागीय आयुक्तांनी काय दिला इशारा?
Solapur tiger latest marathi news
Solapur Tiger News : ५० वर्षांनी सोलापुरात व्याघ्रदर्शन; शेतकऱ्यांमध्ये दहशत
software exports maharashtra
‘आयटी’त पुण्याचा झेंडा! सॉफ्टवेअर निर्यातीत मुंबई, नागपूरपेक्षा अव्वल कामगिरी
Borivali air, Air pollution Mumbai, Air pollution Borivali,
बोरिवलीची हवा ‘अतिवाईट’, मुंबईत हवा प्रदूषणाचे सत्र सुरूच

हेही वाचा – वाघीण आपल्या बछड्यांसह भुयारी मार्गातून जाते तेव्हा… ‘या’ राष्ट्रीय महामार्गावर…

सायबर सेल स्थापनेसाठी प्रधान मुख्य वनसंरक्षक (बनबल प्रमुख) शैलेश टेंभुर्णीकर, महाराष्ट्र राज्य, नागपूर, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) महिप गुप्ता महाराष्ट्र राज्य, नागपूर, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) पश्चिम, मुंबई यांचे मार्गदर्शन लाभले असून या सायबर सेलव्दारे क्षेत्रीय कर्मचारी यांना वने व वन्यजीव विषयक गुन्हे हाताळणे व आरोपीच्या विरोधात पुरावे गोळा करणे व राज्याबाहेरील आरोपींनाही पकडणे सोईचे होणार आहे.

हेही वाचा – वाशिम जिल्ह्याला अवकाळीचा तडाखा; हवामान विभागाच्या मते आज…

सायबर सेलच्या माध्यमातून वने व वन्यजीव गुन्ह्यामधील आरोपींना शिक्षा होण्यास मदत मिळणार असून क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना त्याचा अधिकचा फायदा होऊन त्यांचे मनोबल वाढणार आहे. वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक आर.एम. रामानुजम यांनी सायबर सेल सह्याद्री व्याघ्र राखीव कोल्हापूरसाठी काम करणाऱ्या कर्मचारी व अधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या व अधिक तत्परतेणे व परिणामकरित्या कार्य करुन वने व वन्यजीव विषयक अपराधांवर आळा घालण्यासाठी मार्गदर्शन केले. कार्यक्रमास उपवनसंरक्षक (प्रादेशिक) जी. गुरुप्रसाद, विभागीय वन अधिकारी (वन्यजीव) एस.एस. पवार, सामाजिक वनीकरणचे विभागीय वन अधिकारी एस.डी. गवते तसेच वनविभागाचे इतर वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी व मान्यवर उपस्थित होते.

Story img Loader