बुलढाणा : क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती यंदा डीजे मुक्त होणार आहे.८ एप्रिल पासून जन्मोत्सव निमित्त विविध समाज उपयोगी व प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. समता भूमी ते सत्यशोधक भूमी बुलढाणा दरम्यान निघणारी मशाल यात्रा व महिला जागर हे कार्यक्रम यंदाच्या उत्सवाचे आकर्षण ठरणार आहे. ११ एप्रिल ला सायंकाळी बुलढाणा शहरात शोभायात्रा निघणार असून ही मिरवणूक डीजे मुक्त राहणार आहे .बुलढाणा शहर महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष लक्ष्मीकांत बगाडे यांनी ही माहिती दिली.

स्थानिय पत्रकार भवन येथे आज सोमवारी, ७ एप्रिलला दुपारी समितीच्या पदाधिकाऱ्यांनी प्रसिद्धी माध्यम प्रतिनिधी सोबत संवाद साधला. यावेळी बगाडे यांनी जयंती उत्सव निमित्त विविध कार्यक्रमांची माहिती दिली.समता भूमी असलेल्या पुण्यातील महात्मा फुले यांच्या वाड्यातून माती आणि पाणी घेऊन निघालेली मशाल यात्रा ८ एप्रिलला सकाळी बुलढाण्यात पोहोचेल.महात्मा फुले शाळा येथून ही यात्रा निघून जय स्तंभ चौकातील महात्मा फुले व सावित्रीबाई फुले पुतळ्या जवळ यात्रेचा समारोप होणार आहे.

महिला समितीच्या अध्यक्षा प्रीती khandare म्हणाल्या की, ९ एप्रिलला मुठ्ठे लेआउट बुलढाणा येथील महात्मा फुले शाळेत महिला जागर कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. महिलांसाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. डॉक्टर अश्विनी जाधव या महिलांना आरोग्य विषयी मार्गदर्शन कारणार आहे. तसेच फुले दामप्त्यच्या जीवन कार्यावर आधारित प्रश्न मंजुषा, विविध स्पर्धा, नाटिका आदि कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे.याच दिवशी सायंकाळी पुरस्कार वितरण समारंभ देखील पार पडणार आहे. सामाजिक क्षेत्रातील कामगिरी बद्धल देण्यात येणारा माजी आमदार स्वर्गीय सखाराम अहेर स्मृती पुरस्कार स्थानिय अदिती अर्बनचे सुरेश देवकर यांना प्रदान करण्यात येणार आहे. तसेच शैक्षणिक क्षेत्रातील चांगल्या कामगिरीबद्धल देण्यात येणारा स्वर्गीय सुभाष मानकर स्मृती पुरस्काराच्या मानकरी शिक्षिका कल्पना माने ठरल्या आहे.

अध्यक्ष बगाडे म्हणाले की

१० एप्रिलला महात्मा फुले शाळा येथे सकाळी दहा ते दुपारी तीन पर्यंत आरोग्य शिबिर पार पडणार आहे. या आरोग्य शिबिरात तज्ञ डॉक्टर सहभागी होणार आहेत. ११ एप्रिलला सायंकाळी ५ संगम चौकातून शोभा यात्रेला सुरुवात होणार आहे. यंदाची मिरवणूक डीजे मुक्त राहणार आहे. पत्रकार परिषदेला उपाध्यक्ष विशाल सुरोशे, सचिव राजेश पवार, कार्याध्यक्ष नीलकंठ, सुरेश चौधरी, दीपक चौधरी यांच्यासह महिला समितीच्या अध्यक्ष प्रीती खंडारे, सचिव प्रीती डांगे, कीर्ती चौधरी उपस्थित होते.