लोकसत्ता टीम
नागपूर : प्रवाशांना स्थानकावर सोडण्यास येणाऱ्यांच्या वाहनांसाठी (कार, ऑटोरिक्षा, टॅक्सी) स्वतंत्र मार्गिका उपलब्ध करण्यात आली आहे. यामुळे आता प्रवाशांना सोडण्यास येणाऱ्यांच्या वाहनांची समस्या दूर होणार आहे.
नागपूर स्थानकावर (पश्चिम प्रवेशद्वार) स्वतंत्र मार्गिका उपलब्ध करण्यात आली आहे. यामुळे स्थानकावरील गर्दी कमी होईल आणि वाहतूक सुरळीत होईल, असा विश्वास रेल्वे प्रशासनाला आहे. स्थानकाच्या हेरिटेज इमारतीच्या समोर, मार्गिका क्रमांक २ केवळ चारचाकी ( ड्रॉप अँड गो) वाहनासाठी असणार आहे.
आणखी वाचा-वाशीम : मृग नक्षत्र कोरडेच जाण्याची शक्यता; शेतकरी चिंतेत
तर मार्गिका क्रमांक ३ ऑटोरिक्षा, टॅक्सी आणि चारचाकी (कार)साठी राहणार आहे. त्यानुसार प्रवाशांना मार्गदर्शन करण्यासाठी स्पष्ट फलक लावण्यात आले आहेत.
या मार्गिकेवरून प्रवाशांना वाहनात बसवण्यास (पिक-अप) परवानगी नाही. तथापि, प्रवासी नागपूर (पश्चिम) येथे उपलब्ध असलेल्या प्री-पेड ऑटो बूथचा वापर करू शकतात, असे मध्य रेल्वेचे वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक आशुतोष श्रीवास्तव यांनी सांगितले.