वर्धा : राज्य शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागातर्फे एक नवी सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहे. विभागाच्या महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास संस्थेतर्फे ‘महाराष्ट्र इंटरनॅशनल’ या आंतरराष्ट्रीय रोजगार सुविधा केंद्रास प्रारंभ होत आहे.
हेही वाचा… कुलर ठरला किलर! विजेचा धक्का लागून मायलेकाचा मृत्यू; आर्णी तालुक्यातील घटना
हेही वाचा… अमरावती : घरगुती वादातून पतीने पत्नीची दगडाने ठेचून केली हत्या आणि स्वतःच फोन करून दिली माहिती
या केंद्रामार्फत विदेशात नोकरी करण्यास इच्छूक असलेल्या महाराष्ट्रातील उमेदवारांची नोंदणी, माहिती संकलन व त्यांचे अनुषंगिक प्रशिक्षण हे कार्यक्रम चालतील. या रोजगार सुविधा केंद्राचे आज राज्यपालांच्या हस्ते उद्घाटन होत आहे. हे केंद्र नाविन्यपूर्ण संकल्पनेवर आधारित पहिलेच असे रोजगारपूरक केंद्र ठरणार आहे. कुशल व अकुशल उमेदवारांसाठी इतर देशांत आंतरराष्ट्रीय संधी उपलब्ध करून देणे तसेच आंतरराष्ट्रीय सल्लागार सेवांचा लाभ देण्याचा प्रयत्न या केंद्रातून होणार आहे. भारतात कार्यरत असलेल्या अनेक आंतरराष्ट्रीय रोजगार मदत केंद्राचे या कार्यात सहकार्य मिळणार.