चंद्रपूर : जिल्ह्यात व शहरात सकाळी आठ वाजता पासून मुसळधार पाऊस सुरू आहे. सलग आठ तासापासून सुरू असलेल्या पावसामुळे संपूर्ण चंद्रपूर जलमय झाले आहे. सर्व प्रमुख रस्तावर पाणीच पाणी साचले आहे. खोल भागातील वस्त्या व शेकडो घरात पावसाचे पाणी शिरले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शहरात पहाटेच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. मात्र सात वाजताच्या सुमारास पाऊस थांबला होता. त्यानंतर पुन्हा आठ वाजता पासून मुसळधार पाऊस सुरू झाला. या पावसाचा जोर इतका तीव्र होता की काही मिनिटातच शहरातील सर्व प्रमुख रस्ते जलमय झाले. गेल्या आठ तसापासून सलग हा पाऊस सुरू असल्याने शहरातील गांधी चौक ते जटपुरा गेट या मार्गावर सर्वत्र गुडघ्या इतके पाणी साचले आहे. लक्ष्मी नारायण मंदिर, लोकमान्य टिळक विद्यालय आझाद बगीचा चौक, जयंत टॉकीज या भागात तर माणसाच्या कंबर भर पाणी साचले आहे. या रस्त्यावरील सर्व दुकानात पाणी शिरले आहे. मोहित मोबाईल, शंकराश्रम, चंद्रपूर वन विभागाचे कार्यालय तथा बगीचा समोरील दुकानांची चाळ यात पाणी शिरले आहे. या मार्गावर मोठा नाला आहे. पावसाळ्यापूर्वी या नाल्याची सफाई केली तेव्हा द्रेनेजचे झाकण लावले नाही. पाण्यात नाल्याचे खड्डे न दिसल्याने अनेक विद्यार्थी, मुले, पुरुष, महिला या खड्यात कोसळल्या. सुदैवाने कुठलीही जीवित हानी झाली नाही.

blob:https://www.loksatta.com/668baefe-f918-4280-b82e-6103cd6d199a
संपूर्ण चंद्रपूर जलमय; अनेक वस्त्या पाण्याखाली, हजारो घरात पावसाचे पाणी शिरले

हेही वाचा >>>सोमय्या यांच्यावर महिला नेत्यांची टीका, म्हणाल्या ‘ त्यांचे आचरण भाजप संस्कृतीप्रमाणेच’

कस्तुरबा गांधी मार्गावर स्टेट बँक ऑफ इंडियाचे शाखेत पाणी शेरले आहे. या बँकेचे एटीएम पाण्यात आहे. सिटी हायस्कूल मध्ये पाणी शिरले आहे. त्यामुळे शाळेचे विद्यार्थी अडकून पडले आहेत. डॉ. कोलते हॉस्पिटल, कस्तुरबा चौक या भागात देखील पाणी साचले आहे. शहरातील मुख्य बाजारपेठ असलेला गोल बाजार पाण्यात आहे. गंज वॉर्डातील भाजी बाजारात देखील पाणी साचले आहे. श्री टॉकीज चौकात पाणी आहे. तुकुम तथा वाहतूक पोलिस शाखा कार्यालय, हॉटेल सिद्धार्थ या भागात रस्त्यावर कंबर भर पाणी आहे. पाऊस अजूनही सुरूच असल्याने पाणी वाढत आहे. शहरातील सकाळच्या शाळेतील विद्यार्थी शाळेत अडकून पडले आहेत. स्कूल बस, स्कूल ऑटो शाळेत पोहचू न शकल्याने हजारो सकाळच्या सत्रातील विद्यार्थी सायंकाळी ४ वाजेपर्यंत घरी पोहचले नव्हते. शहरातील जलनगर, महसूल कॉलनी, सिस्टर कॉलनी, वडगाव, नगिनाबाग, रामनगर, बिनबा गेट, पठाणपुरा, नागपूर रोड, रहमत नगर, लखमापूर, अंचलेस्वर गेट या भागात अनेक घरात पावसाचे पाणी शिरले आहे. हजारो घरे पाण्याखाली आली असल्याने जिल्हा प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

हेही वाचा >>>VIDEO: इकडे मान्सूनचा वेग वाढला… आणि पक्ष्यांची वीण घट्ट होऊ लागली

दरम्यान, महानगर पालिकेचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे. नदी नाल्यांची सफाई योग्य पद्धतीने न झाल्यानेच शहरातील रस्ते पाण्याने तुडुंब भरले असल्याचा आरोप आता सर्वसामान्य जनता करीत आहे. बंगाली कॅम्प आदर्श पेट्रोल पंप समोर सर्वत्र पाणी आहे. या भागात अनेक दुकानात पाणी शिरले आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thousands of houses were flooded due to heavy rains in chandrapur rsj 74 amy