बुलढाणा : चिखली पोलीस ठाण्याचे ठाणेदार संग्राम पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी समीर आणि डुबल्या हे रात्री नऊ वाजताच्या सुमारास चिखली शहरातील राज वाईन बारमध्ये गेले. यावेळी बारच्या गल्ल्यावर मालक सुनील सखाराम अप्पा जिरवणकर हे बसले होते. या दोघांनी चाकू जिरवणकर यांच्या गळ्याला लावून आरडा ओरड केल्यास चाकू ने भोसकण्याची धमकी दिली. यानंतर गल्ल्यातील अकराशे आणि खिश्यातील नऊशे रुपये हिसकावून पळ काढला.
दरम्यान जिरवणकर यांनी घटनेची माहिती चिखली पोलिसांना दिली. दोघे आरोपी गुंड प्रवृत्तीचे असल्याने आणि त्यांची चिखलीमध्ये दहशत वाढत आहे. यामुळे ठाणेदार संग्राम पाटील यांनी त्यांच्या तपासासाठी एक पथक गठीत केले. त्यांना रात्री उशिरा जेरबंद करण्यात आले. त्यांच्याकडून चाकू आणि दोन हजार रोख जप्त करण्यात आले. पोलीस उपनिरीक्षक परमेश्वर केंद्रे, यासह पोलीस कर्मचारी शरद भागवतकर, समाधान वडणे, आदी पोलिसांनी ही कारवाई केली.
हेही वाचा – हेल्थ मॅरेथॉन : आरोग्य आणि पर्यावरण संवर्धनासाठी धावले शेकडो यवतमाळकर
हेही वाचा – नागपूर पोलिसांना झाले तरी काय? दोन वसुलीबाज हवालदार निलंबित
रात्री वाईन बारमध्ये आलेल्या दोघांनी मालकाच्या गळ्याला चाकू लावला व ओरडला तर चाकूने भोसकण्याची धमकी देत गल्ल्यातील रक्कम घेऊन पळ काढला. बुलढाणा जिल्ह्यातील चिखली शहरात हा थरारक घटनाक्रम घडला. या घटनेनंतर फरार झालेल्या व चिखलीमधील गौरक्षण वाडीमध्ये दडून बसलेल्या दोघा आरोपींना पोलिसांनी रात्रभरातून अटक केली आहे. सैय्यद समीर सैय्यद जहीर आणि विशाल राजेश उर्फ डुबल्या अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीसच्या विविध कलमांनुसार गुन्हे दाखल करण्यात आले. शनिवारी, पाच जानेवारी रोजी त्यांना चिखली न्यायालयात हजर करण्यात आले. त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली असून दोघा आरोपींची जिल्हा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.