लोकसत्ता टीम

नागपूर : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानासाठी प्रचार जोरात सुरू असताना सोमवारी सकाळी नागपुरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी देणारा ई- मेल नागपूर विमानतळ प्रशासनाला प्राप्त झाला.

Supreme Court directs Sahara Group to deposit Rs 1000 crore
सहारा समूहाला १,००० कोटी जमा करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश; मुंबई जमीन विकसित करण्यासाठी संयुक्त भागीदारीस परवानगी
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
8 buildings of 22 floors in the first phase construction in ramabai ambedkar nagar in ghatkopar
घाटकोपरमधील रमाबाई आंबेडकर नगर पुनर्विकास; पहिल्या टप्प्यात २२ मजली आठ इमारतींची उभारणी
Indigo flight, emergency landing, bomb threat, Nagpur airport, Jabalpur to Hyderabad Flight, bomb squad, passenger evacuation, security check, airport alert
विमानात बॉम्ब ठेवल्याची अफवा, नागपुरात इमर्जन्सी लॅण्डिंग
reliance 5 airport marathi news
‘रिलायन्स’कडील पाचही विमानतळ ताब्यात, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे पुन्हा देण्याचा निर्णय
16 check in counters at the old terminal of pune airport says muralidhar mohol
पुणेकर हवाई प्रवाशांना खुशखबर! पुणे विमानतळाबाबत मुरलीधर मोहोळ यांची मोठी घोषणा
Muralidhar Mohol demanded Pune International Airport be named as Jagadguru Santshrestha Tukaram Maharaj
पुणे विमानतळाबद्दल मुरलीधर मोहोळ यांची मोठी मागणी, म्हणाले…
medical room, new terminal, Pune airport,
हवाई प्रवाशांवर आता तातडीने उपचार! पुणे विमानतळावरील नवीन टर्मिनलमध्ये आपत्कालीन वैद्यकीय कक्ष कार्यान्वित

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या दोन टप्प्यात विदर्भातील सर्व दहा जागांसाठी मतदान पार पडले आहे. या दोन्ही टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस नेते राहुल गांधी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, काँग्रेस राष्ट्रीय अध्यक्ष मल्लीकार्जुन खरेग आणि इतर अनेक बडे नेत्यांच्या सभा झाल्या आहे. त्यासाठी हे नेते नागपूर विमानतळावर आले आणि तेथून हेलिकॉप्टर सभास्थळी रवाना झाले होते. या विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी सोमवारी सकाळी साडेदहा वाजता एका ईमेलद्वारे देण्यात आली. त्यानंतर बीडीडीएस आणि डॉग स्क्वॅड नागपूर विमानतळावर तैनात करण्यात आले आहे. सीआयएफची पथक सतर्क झाले आहे. सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे.

आणखी वाचा-नागपूर : इंस्टाग्राम मित्राचा तरुणीवर लैंगिक अत्याचार

नागपूर विमानतळाकडे जाणाऱ्या वाहनांची तपासणी केली जात आहे. तसेच विमानतळाच्या वाहनतळावर सर्व वाहनांची कसून तपासणी केली जात आहे. तसेच विमानतळाच्या चारही बाजूंनी सुरक्षा वाढण्यात आली आणि गस्त घालण्यात येत आहे. बॉम्बने विमानतळ उडण्याची धमकी आल्याच्या वृत्ताला विमानतळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला आहे. देशातील इतर काही विमानतळाला अशाच प्रकारचे धमकीचे मेल आल्याची माहिती आहे.