लोकसत्ता टीम

नागपूर : युवकाने बारावीच्या विद्यार्थिनीला प्रेमाच्या जाळ्यात ओढल्यानंतर तिचे अश्लील छायाचित्र आणि चित्रफित काढली. ती चित्रफित फेसबुक-इंस्टाग्रामवर टाकून बदनामी करण्याची धमकी तिच्या आईवडिलांना देऊन मुलीवर आठ महिने लैंगिक शोषण केले. तसेच चित्रफित मित्रांच्या व्हॉट्सअप ग्रूपवर टाकली. या प्रकरणी विद्यार्थिनीने जरीपटका पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी आरोपी शेख राशीद शेख आसिफ (२०, रा. ताजनगर टेकानाका पाचपावली) याला अटक केली.

village near Dombivli brother of private tution teacher sexually assaulted eight year old girl
डोंबिवलीत खासगी शिकवणी चालिकेच्या भावाचा बालिकेवर लैंगिक अत्याचार
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Man arrested for attempting to rob minor girl Mumbai news
मुंबईः अल्पवयीन मुलीवर हल्ला करून लुटण्याचा प्रयत्न करणारा अटकेत
psychiatrist sexually abused nearly hundred women in Hudakeshwar area
नागपूर : खळबळजनक! मानसोपचार तज्ज्ञाकडून शंभरावर मुली-महिलांचे लैंगिक शोषण…
Neil Gaiman sexual misconduct
Who is Neil Gaiman: ‘लहान मुलासमोरच माझ्यावर लैंगिक अत्याचार’, ८ महिलांचे प्रसिद्ध लेखकावर लैंगिक अत्याचाराचे आरोप
Rape of a woman, lure of marriage, Pune, fraud,
पुणे : विवाहाच्या आमिषाने महिलेवर बलत्कार, आरोपीकडून अधिकारी असल्याची बतावणी; ३८ लाखांची फसवणूक
misunderstanding of kidnapping because of girl scream in car
कारमध्ये आरडाओरड करणे आले अंगलट, काय घडले?
Anjali Damania on Walmik Karad
Anjali Damania : संतोष देशमुख हत्याप्रकरणात अंजली दमानिया यांचा आणखी एक गौप्यस्फोट, PCR ची प्रत शेअर करत म्हणाल्या…

शेख राशीद हा पेंटींगचे काम करतो. तर पीडित अल्पवयीन विद्यार्थिनी १६ वर्षांची असून ती इयत्ता १२ वीला शिकते. आरोपी शेख राशीद अल्पवयीन विद्यार्थिनीच्या महाविद्यालयाच्या बाहेर उभा रहायचा. तिचा नेहमी पाठलाग करीत होता. तिच्या घरापर्यंत तिच्या पाठीमागे जात होता. त्यातून त्यांची ओळख झाली आणि आरोपीने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. मोठा व्यवसाय करीत असल्याचे सांगून तिला सुरुवातीला महागडे भेटवस्तू दिल्या. तिला अनेकदा हॉटेलमध्ये नेले. त्यानंतर आरोपीने ती अल्पवयीन असल्याचा गैरफायदा घेऊन तिला आपल्या मित्राच्या खोलीवर नेले. तिला शारीरिक संबंधाची मागणी केली. मात्र, तिने नकार दिला. त्यामुळे त्याने तिच्याशी जबरदस्तीने शारिरीक संबंध प्रस्थापित केले. त्याची ‘व्हिडीओ क्लिप’ आरोपीने तयार केली. त्यानंतर ती फेसबुकवर प्रसारित करण्याची धमकी देऊन वारंवार अल्पवयीन विद्यार्थिनीचे शारिरीक शोषण करु लागला.

आणखी वाचा-यवतमाळ : तहसीलदाराच्या कारने दुचाकीस उडविले, दोघांचा मृत्यू

जवळपास आठ महिने आरोपीने तिचे शोषण केले. त्याचा या त्रासाला विद्यार्थिनी कंटाळली होती. त्यामुळे अल्पवयीन मुलीने त्याच्यासोबत बाहेर जाणे बंद करून आईला ही बाब सांगितली. परंतु, आरोपीने अल्पवयीन मुलीच्या घरी जाऊन तिच्या आईला शिविगाळ करून मारण्याची धमकी दिली. त्यानंतर आईलाही अश्लील चित्रफित दाखवून बदनामी करण्याची धमकी दिली. तिच्याशी घरात जाऊन अश्लील चाळे करीत सोबत फिरायला जाण्यासाठी बाध्य केले. अखेर अल्पवयीन मुलीच्या आईने जरीपटका ठाण्यात तक्रार दिली. जरीपटक्याचे ठाणेदार दीपक भिताडे यांच्या मार्गदर्शनात सहायक निरीक्षक शशिकांत तायडे यांनी आरोपी शेख राशीदविरुद्ध गुन्हा दाखल करून आरोपीस अटक केली आहे.

Story img Loader