जुन्या पेन्शन योजनेसाठी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी आजपासून बेमुदत संप पुकारला आहे. माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनीही संपात सामील होत आहेत. मात्र संपात जाण्याऱ्या शिक्षकांना प्राचार्यांकडून नोकरीवरून काढण्याची धमकी दिली जात आहे.
हेही वाचा >>>नागपूर: ज्यांनी जंगल सांभाळले त्यांनाच अधिकारांपासून वंचित ठेवले! विदर्भ निसर्ग संरक्षण संस्थेची खंत
पेन्शन योजनेच्या मागणीसाठी आजपासून (१४ मार्च) जवळपास १८ लाख सरकारी कर्मचारी बेमुदत संपावर जाणार आहेत. यात शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा समावेश सर्वाधिक आहे. त्यामुळे आज सकाळच्या पाळीतील काही शिक्षकांनी मुख्याध्यापक आणि प्राचार्यांना जुन्या पेन्शनच्या मागणीचे निवेदन दिले. तसेच संपावर जात असल्याचा इशारा दिला. यावर मुख्याध्यापकांडून अशा शिक्षकांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. मात्र असे असले तरी अनेक शिक्षक आज रस्त्यावर उतरणार आहेत.असा निर्धार संपकर्त्या शिक्षकांनी दिला आहे.