लोकसत्‍ता टीम

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अमरावती : मांडूळ प्रजातीचा साप विक्री करण्याच्या प्रयत्नात असलेल्या तिघांना वन विभागाच्या पथकाने शनिवारी सापळा रचून एमआयडीसी परिसरातून अटक केली. आरोपींकडून एक मांडूळ साप जप्त करण्यात आला आहे.

आणखी वाचा-ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पात वाघाचा सांगाडा सापडला; ‘माया’ वाघिणीच्या मृत्यूच्या चर्चेला उधाण

अंकुश रमेश पवार (२३), मंगल मधूकर बेले (३२) व प्रवीण हनुमंत लडके (३३) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. हे तिघे एमआयडीसी परिसरात मांडूळ प्रजातीचा साप विक्री करण्यासाठी आले असल्याची माहिती वन विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली. या माहितीच्या आधारावर अमरावतीचे विभागीय वनाधिकारी (दक्षता) किरण पाटील, वनपरिक्षेत्र अधिकारी (फिरते पथक) प्रशांत भुजाडे, वनपाल पी. व्ही. निर्मळ, वन्यजीव अपराध नियंत्रण कक्षाचे वनरक्षक अनंत नायसे, स्वप्निल राऊत, वनरक्षक हेमंत पांगरे, दिनेश धारपवार, पी. आर. वानखडे, आर. ए. जुनघरे, सी. बी. मानकर यांनी परिसरात सापळा रचला. यावेळी बनावट ग्राहक पाठवून आरोपींना अटक करण्‍यात आली आणि त्यांच्याकडून साप जप्त करण्यात आला. आरोपींकडून मांडूळ प्रजातीच्या सापासह इतर वन्यप्राणी जिवंत मिळण्याची शक्यता असल्याने त्यांची कसून चौकशी सुरू आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Three arrested for trying to sell mandul snake mma 73 mrj