चंद्रपूर: शाळा सुटल्यानंतर वर्धा नदीपात्रात खेकडे पकडण्यासाठी गेलेल्या पाचव्या वर्गातील तीन शाळकरी मित्रांचा बुडून दुदैवी मृत्यू झाल्याची घटना गोंडपिपरी तालुक्यातील तोहोगाव येथे शनिवारी दुपारी घडली. प्रतिक नेताजी जुनघरे (११), निर्दाेष ईश्वर रंगारी (११), बन्नी सुरेश रायपुरे (११) अशी मृत बालकांची नावे आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रतिक, निर्दाेष, बन्नी यांच्यासह चांदेकर नामक हे चौघे बालक सकाळी शाळा संपल्यानंतर दुपारी खेकडे पकडण्यासाठी वर्धा नदीपात्रावर गेले होते. त्यानंतर प्रतिक, निर्दाेष, बन्नी हे तिघेही पाण्यात उतरले मात्र, त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने ते बुडू लागले. हे बाहेर उभ्या असलेल्या चांदेकर नामक बालकाच्या लक्षात येताच त्यांने भीतीपोटे थेट गाव गाठत घटनेची माहिती ग्रामस्थांना दिली. यानंतर संपूर्ण गाव वर्धा नदीपात्राजवळ जमा झाले. घटनेची माहिती कोठारी पोलिसांना देण्यात आली असून पोलीस बालकांचा शोध घेत आहे.