वर्धा:शहरात गुन्हा करण्याच्य्या हेतूने आले खरे, मात्र पोलीसांना वेळीच खबर लागल्याने नागपूरचे पंकज प्रभाकर साठवणे, मिलिंद प्रेम हिराणी व आकाश ज्ञानेश्वर बांगडे हे जाळ्यात अडकले. या तिघांची अट्टल गुन्हेगार म्हणून पोलीस दफ्तरी नोंद आहे.रामनगर पोलीसांना सक्करदरा येथील तीन सराईत दखलपात्र गुन्हा करण्यासाठी आल्याचा सुगावा लागला. जुना पाणी चौकात नाकाबंदी करण्यात आली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>>अमरावती: कॉलेजला दांडी अन ‘ती’ प्रियकरासोबत चहाच्या टपरीवर…

तेव्हा या रस्त्यावर एक काळ्या रंगाची कार येताना दिसली. तपासणी केल्यावर त्यात तिघे आढळून आले. त्यांना विचारपूस केल्यावर ते हडबडले. याच कारमध्ये मोठा दारू साठा तसेच शस्त्रे आढळून आली. तिघांनाही अटक करण्यात आली आहे.तसेच पाच लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.या तिघांची कसून चौकशी सुरू असून ते कोणता गुन्हा करण्यासाठी वर्धेत आल्याबाबत तपासणी होत आहे.