नागपूर: उमरेड तालुक्यातील कुही पोलीस ठाणे हद्दीतील  एक कुटुंब, नातेवाईकांसह  आंबे खाण्यासाठी एका शेतात गेले. पण  झाडाला आंबे नसल्याने कुटुंबाने शेजारील मटकाझरी तलावाशेजारी डब्बा खाण्यासाठी गेले. तलावातील पाणी पाहून काहींना पोहण्याचा मोह झाला. ते तलावात उतरले पण पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने  तिघांचा बुडून मृत्यू झाला. जितेंद्र इस्ताराम शेंडे (३५) रा. गुलमोहर नगर, भरतवाडा, नागपूर, संतोष किशोर बावणे (२५) रा. श्रावण नगर, वाठोडा, नागपूर, निषेध राजू पोपट (१२) रा. वाठोडा, नागपूर असे दगावलेल्या तिघांची नावे आहेत.  ज्योत्सना शेंडे, मंगला राजेश पोपट, देवांशी (८ वर्षीय मुलगी) असे त्यांच्यासोबत शेतावर गेलेल्यांची नावे आहेत.  तिघांचेही मृतदेह गुरूवारी रात्री उशिरा तलावातून बाहेर काढण्यात आले.

शुक्रवारी  ही घटना उघडकीस आली. कुही पोलिसांच्या माहितीनुसार, या कुटुंबातील सात सदस्य कारने पाचगाव सुरगाव येथील नातेवाईकांच्या शेतात आंबे खाण्यासाठी गुरूवारी दुपारी गेले होते. येथे झाडाला आंबे नव्हते. त्यामुळे सगळ्यांनी जवळच्या मटकाझरी तलावावर डब्बा पार्टीचे नियोजन केले. प्रचंड उकाड्यामुळे जितेंद्र आणि संतोष यांनी पार्टीपूर्वी तलावात अंघोळीचा निर्णय घेतला. दोघेही तलावात उतरले. त्यांच्या पाठोपाठ निषेध हा बारा वर्षीय मुलगाही पाण्यात पोहायला आला. तिघेही खोल पाण्यात पोहत असतांना अचानक जितेंद्र बुडू लागला. संतोष व निषेध त्याला वाचवायला गेले असता तेही बुडू लागले. हा प्रकार बघून तेथे गेलेल्या कारच्या चालकाने झटपट तलावात उडी घेऊन निषेधला तलवातून बाहेर काढण्यात यश मिळवले. परंतु निषेधचा आधीच मृत्यू झाला होता. ही माहिती कळताच गावकऱ्यांसह पोलिस मोठ्या संख्येने घटनास्थळी पोहचले. गुरूवारी रात्री उशिरापर्यत सर्व मृतदेह बाहेर काढण्यात यश मिळाले. या प्रकरणात पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करत सगळे मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवले.

harbhara farming
लोकशिवार: किफायतशीर हरभरा!
IND vs NZ AB de Villiers on Rishabh Pant Controversial Dismissal
IND vs NZ : ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर…
odisha cyclone
ओडिशात १.७५ लाख एकर पिकांचे नुकसान, दाना चक्रीवादळाचा परिणाम
sky lanterns, heavy rainfall, lanterns, lanterns news,
कंदिलांना काजळी, आकाश कंदिलांकडे नागरिकांची पाठ, बेभरवशी पावसामुळे नुकसान
Three laborers died after a water tank collapsed in Pimpri Chinchwad
Pune Water Tank Collapse : पिंपरी- चिंचवडमध्ये पाण्याची टाकी कोसळून पाच कामगारांचा मृत्यू; ७ गंभीर जखमी
Leaders do not come to ask for votes banners at Pangul Colony in Nagpur
नेत्यांनो, मत मागायला येऊ नका! नागपुरातील पांगूळ वसाहतीत फलक
Fish dead in Murbe Satpati Bay palghar news
मुरबे सातपाटी खाडीत हजारो मासे मृत; प्रदूषित पाण्यामुळे घटना घडल्याचे मच्छीमारांचे आरोप
Muddy and smelly water
मुंबई: पूर्व उपनगरात गढूळ व दुर्गंधीयुक्त पाणी; भातसा पाणलोट क्षेत्रातील पावसामुळे नदीपात्रात गढूळ पाणी, महापालिकेचा दावा

हेही वाचा >>>विदर्भावर सूर्य कोपला… आज पुन्हा उष्णतेच्या तीव्र लाटेचा इशारा….

नागपुरातील गोताखोर बालावले

मटकाझरी तलावाच्या जागेवर पूर्वी गाव होते. त्यामुळे येथील तलावात बऱ्याच विहिरी आहेत. त्या बुजवण्यात आल्या नाही. या विहरीतच बुडून तिघांचाही मृत्यू झाला.   बुडालेल्यांना  बाहेर काढण्यासाठी पोलिसांनी नागपुरातून गोताखोर बोलावले होते. त्यांच्या मदतीने गरूवारी रात्री उशिरा संतोष आणि जितेंद्र यांचे मृतदेह बाहेर काढले.

वर्ष २०२१ मध्येही एक मृत्यू

तिघेही बुडालेल्या तलावातील विहरीत २०२१ मध्येही एकाचा बुडून मृत्यू झाला होता. त्यानंतर तलाव परिसरात प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून एक फलकही लावण्यात आला आहे. त्यानंतरही तिघेही तलावात पोहायला उतरले. त्यामुळे दुदैवी घटना घडल्याची माहिती कुही पोलीस ठाण्याचे अधिकारी भानूदास पिदूरकर यांनी लोकसत्ताशी बोलतांना दिली.