यवतमाळ : विदर्भात अतिवृष्टीने पिकं खरडून गेल्यानंतर आता पावसाने उघडीप दिल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. अशा परिस्थितीत शेतात वाढणाऱ्या पिकांमध्ये वन्यप्राण्यांचा प्रादूर्भाव वाढल्याने शेतकऱ्यांसमोर नवीन समस्या निर्माण झाली आहे. वन्यप्राण्यांमुळे होत असलेल्या पिकांच्या नासाडीने त्रस्त शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे सत्र यवतमाळ जिल्ह्यात सुरू झाल्याने चिंता व्यक्त होत आहे. तीन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची बाब समोर आल्याने खळबळ उडाली आहे.

पांढरकवडा तालुक्यातील टिप्पेश्वर अभयारण्यालगतच्या सुन्ना व टेम्बी येथे दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, तर तिसरी आत्महत्या राळेगाव तालुक्यातील उमर विहीर या पारधी बेड्यावर झाली. टेम्बी या खेड्यात आदिवासी शेतकरी कर्णू किनाके यांनी स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला १४ ऑगस्टच्या सायंकाळी कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केली. कर्णू किनाके यांनी वन्यप्राण्यांच्या त्रासासह नापिकीमुळे आत्महत्या केल्याची माहिती त्यांच्या कुटुंबियांनी दिली. तर वन्य प्राण्यांनी उभं पीक नष्ट केल्यामुळे निराश झालेल्या राळेगाव तालुक्यातील वडकी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असलेल्या उमर विहीर येथील शालू उर्फ शालूरंगा अमित पवार (४०) या शेतकरी महिलेने विषारी औषध घेऊन आत्महत्या केली.

crores of rupees seized from car in khed shivapur toll naka area
अन्वयार्थ : हजार कोटी सापडले, त्याचे पुढे काय झाले?
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
majority of bird species in india face decline
देशातील पक्ष्यांच्या संख्येत लक्षणीय घट; जाणून घ्या, मानवी चुका किती हानीकारक
phulambri Fire shop, phulambri, Fire in a shop,
छत्रपती संभाजीनगर : फुलंब्रीतील दुकानात आगीनंतर भडका; तिघांचा मृत्यू, दोघे गंभीर
fire toy shop Amravati, Amravati, fire toy shop,
अमरावतीत खेळणी दुकानाला भीषण आग
Two houses including shop damaged in fire in Fernandiswadi
नाशिक : फर्नांडिसवाडीतील आगीत दुकानासह दोन घरांचे नुकसान
Khed Parshuram Ghat accident, Khed Parshuram Ghat,
खेड परशुराम घाटात दाट धुक्यामुळे चार वाहनांचा विचित्र अपघात; वाहनांचे मोठे नुकसान तर जीवितहानी टळली
india railway viral news Husband-Wife Fight
नवरा-बायकोतील भांडण अन् रेल्वेचे तीन कोटींचे नुकसान! OK मुळे चुकीच्या स्थानकावर पोहोचली ट्रेन; नेमकं घडलं काय? वाचा…

हेही वाचा : वर्धा : निकामी बॉम्बमधील धातूचे तुकडे वेचताना शेतमजुराचा मृत्यू

ही घटना १२ ऑगस्टला उघडकीस आली. घटनेच्या दिवशी ती सकाळी शेतात गेली असता शेतातील कपाशीचे पूर्ण पीक वन्य प्राण्यांनी खाऊन टाकल्याचे दिसले. त्यामुळे निराश झालेल्या शेतकरी महिलेने टोकाचे पाऊल उचलून शेतातच विषारी औषध प्राशन केले. यापूर्वी केळापूर तालुक्यातील सुन्ना या खेड्यातील प्रगतीशील युवा शेतकरी राजू जिड्डेवार यांनी वन्यप्राण्यांच्या त्रासाला कंटाळून आपल्या शेतातच आत्महत्या केली होती. राजू जिड्डेवार यांची पत्नी अश्विनी जिड्डेवार यांनी आपल्या शेतात आजही अस्वलं येत असून पिकांची नासाडी करत असल्याची तक्रार वनविभागाला दिली आहे. मात्र अद्यापही कार्यवाही झाली नाही.

हेही वाचा : एमपीएससीमार्फत राज्य दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संवर्गातील ८२३ जागांसाठी पदभरती!

वन्यप्राण्यांच्या त्रासामुळे शेतकरी बेजार झाले असून रोही, रानडुक्कर, अस्वल व वाघांच्या त्रासामुळे अनेक भागात शेतकऱ्यांची पिके नष्ट झाल्यामुळे शेतकरी उपासमारीला तोंड देत आहेत. वन्य प्राण्यांच्या त्रासामुळे अनेक शेतकऱ्यांनी शेतात जाणे सोडल्याने शेतकरी कुटुंबांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. शेतकरी वन्य प्राण्यांमुळे त्रस्त असताना वन खाते व प्रशासन मात्र बघ्याच्या भूमिकेत आहेत, असा आरोप शेतकरी नेते व शिवसेना प्रवक्ते किशोर तिवारी यांनी केला आहे.

हेही वाचा : दोन मुलांची आई, सलग १८ वर्षे ठेवला संयम, अखेर ‘वर्दी’चे स्वप्न केले साकार

‘२५ लाखांची मदत द्या’

या वर्षी विदर्भात विक्रमी १ हजार ५६४ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यातच आता वन्य प्राण्यांच्या प्रचंड त्रासामुळे उदासीन शेतकरी मोठ्या प्रमाणात आर्थिक अडचणीत आल्यामुळे आत्महत्या करीत आहेत. ‘महाराष्ट्र सरकारने वन्यप्राण्यांमुळे शेती व जीविताचे संरक्षण करणारा कार्यक्रम तात्काळ लागू करावा व वन्य प्राण्यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांना तसेच वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात मयत झाल्यास २५ लाख रुपये मदत करावी’, अशी मागणी शेतकरी नेते व शिवसेना प्रवक्ते किशोर तिवारी यांनी केली आहे .