गडचिरोली : लोहखनिज वाहतूक करणाऱ्या भरधाव ट्रकने दुचाकीला दिलेल्या धडकेत एकाच कुटुंबातील दुचाकीवरील तिघे जागीच ठार झाले. तर एक गंभीर जखमी आहे. ही घटना २५ सप्टेंबरला दुपारी ४ वाजेच्या सुमारास घडली. मृतांत आई- मुलासह चुलत सासूचा समावेश आहे. एकाच कुटुंबातील तिघे गतप्राण झाल्याने मार्कंडा गावावर शोककळा पसरली आहे.

हेही वाचा >>> निकालाच्या प्रतीक्षेत असताना तलाठी भरती परीक्षा स्थगित होणार? न्यायालयात याचिका दाखल, काय आहे मागणी…

youth died on the spot in an accident today on Buldhana Chikhali state highway
स्कूलबस आणि दुचाकीची धडक, युवकाचा मृत्यू; चिखली राज्य मार्गावरील घटना
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
BJP leaders vikasrao dube son amol dube kidnapped from Parli ransom of Rs 2 crore demanded
परळीतून भाजप नेत्याच्या मुलाचे अपहरण; दोन कोटींच्या खंडणीची मागणी
speeding luxury car collide straight into grade
भरधाव अलीशान कार थेट गॅरेजमध्‍ये घुसली; तिघे गंभीर जखमी, अलिबाग चोंढी येथील घटना
Two speeding bikes collide head-on two killed
अमरावती : भरधाव दुचाकींची समोरासमोर धडक; दोन ठार
Best Bus accident, Inquiry committee BEST,
Best Bus Accident : मृतांच्या नातेवाईकांना दोन लाखांची तातडीची मदत, बेस्ट उपक्रमाकडून चौकशी समिती स्थापन
Devendra Fadnavis Kurla BEST Bus Accident Updates in Marathi
Kurla Bus Accident : कुर्ला दुर्घटनेतील मृतांची संख्या सातवर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून नातेवाईकांना नुकसानभरपाईची घोषणा!
Kurla Best bus accident, Sanjay More ,
Kurla Bus Accident : कुर्ला बेस्ट बस अपघात प्रकरणी चालक संजय मोरेला अटक

प्रियंका गणेश जनध्यालवार (२४) , रुद्र गणेश जनध्यालवार (५) व भावना नरेंद्र जनध्यालवार (४५) अशी मृतांची नावे आहेत. नरेंद्र नरेश जनध्यालवार (५२) हे जखमी आहेत. मार्कंडादेव (ता.चामोर्शी) येथील हे कुटुंब कामानिमित्त तहसील कार्यालयात आले होते. काम आटोपून दुपारी ४ वाजता दुचाकीवरुन (एमएच ३३ के-३१३५) गावी जाण्यासाठी निघाले. याचवेळी सुरजागड येथून लोहखनिज घेऊन ट्रक (सीजी ०८ एयू- ९०४५) येत होता. या ट्रकने तहसील कार्यालयासमोर दुचाकीला चिरडले. दुचाकी समोरील चाकाखाली सापडल्यानंतर १० तेे १५ फूट फरफटत गेली. रुद्र व भावना यांचा जागीच मृत्यू झाला, तर प्रियंका यांनी जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान प्राण सोडले. नरेंद्र जनध्यालवार यांची मृत्यूशी झुंज सुरु आहे.

हेही वाचा >>> भारत-कॅनडामध्ये तणाव; कृषी, शेतकऱ्यांसह अन्नसुरक्षेवर दबाव!

दरम्यान, अपघातानंतर चालकाने वाहन तेथेच सोडून पोबारा केला. अपघात एवढा भीषण होता की ट्रकमध्ये फसलेले मृतदेह काढण्यासाठी जेसीबी बोलवावा लागला. यावेळी मोठी गर्दी झाली होती. स्थानिकांनी सूरजागड लोह खनिज वाहतुकीविरुध्द तीव्र संताप व्यक्त केला. यावेळी पो.नि.विजयानंद पाटील यांनी स्थानिकांच्या मदतीने मृतदेह ट्रकखालून काढून रुग्णालयात पाठवले.

कुटुंबावर दुसरा आघात अपघातात ठार झालेल्या चिमुकल्या रुद्र याचे वडील गणेश जनध्यालवार यांचा २० दिवसांपूर्वीच मृत्यू झाल्या. या दु:खातून कुटुंब सावरलेही नव्हते तोच अपघातात तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यामुळे जनध्यालवार कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला असून हळहळ व्यक्त होत आहे.

Story img Loader