बुलढाणा : मध्यप्रदेश राज्य परिवहन महामंडळाची बस आणि मेटॅडोर यांची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात तीन मजूर ठार तर बस मधील १७ प्रवासी जखमी झाले. जखमींवर खामगाव येथील सामान्य रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे.खामगाव नांदुरा मार्गावरील आणि जलन्ब पोलीस ठाणे हद्धीतील आमसरी फाट्या जवळ ही आज मंगळवारी, १५ एप्रिल रोजी सकाळी ही भीषण दुर्घटना घडली. आठवडाभरापूर्वी तिहेरी अपघाताची घटना याच मार्गावर घडली होती. प्राप्त माहितीनुसार मध्यप्रदेश परिवहन विभागाची बस आणि विटांची वाहतूक करणाऱ्या मिनी ट्रकची समोरासमोर धडक झाली, यात ३ जण ठार तर १७ प्रवासी जखमी झाले आहे.

मध्य प्रदेश परिवहन विभागाची बस अमरावती वरून बऱ्हाणपूर कडे जात होती. स्थानिकाने दिलेल्या माहितीनुसार विटांची वाहतूक करणारा ट्रक ‘राँग साइड’ने जात होता. आमसरी फाट्याजवळ या दोन वाहनांची भीषण धडक झाली, यात ट्रक मधील ३ मजुरांचा जागीच मृत्यू झाला आहे. एसटी बस मधील १७ प्रवासी जखमी असून त्यांना पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने उपचारासाठी दाखल केले आहे.

मृत व जखमीची नावे

या भीषण अपघातात बळीराम मानसिंग चमलाखा (वय ३५ रा सांगमोळी, बऱ्हा णपूर मध्य प्रदेश )पाटोड्या मानसिंग भयड्या (वय ३५ रा नागरटी, तालुका जळगाव जामोद जिल्हा बुलढाणा ) प्रेमसिंग बद्री धरावे (वय ३५, राहणार कोलोरी बऱ्हाणपूर, मध्यप्रदेश ) यांचा जागीच मृत्यू झाला. जखमी प्रवाश्यांची नावे पुढीलप्रमाणे आहे.वसीम शेख बशीर रा. मेलवाडा बऱ्हाणपूर मध्यप्रदेश , शंकर पिता जानू जटाळे वय ६० रा. मध्यप्रदेश , ज्ञानेश्वरी प्रल्हाद कळंब वय ४० रा. अकोला, धीरज सेवादास धंजय वय ४०रा. अकोला, ज्योती धीरज धंजय वय ३० रा. अकोला, बबिता संतोष भोजने वय ४० रा. खामगाव, विमला सुरेश मिश्रा वय ५९ रा. खामगांव, समाधान श्रीकृष्ण बोरे वय २७ रा. आडोळ, शामलाल बाबुलाल काचगरा वय ३५ रा. कावळाजीरी (अमरावती), उषा नामदेव यादव वय ४४ रा. अकोला, एश्वर्या प्रकाश चव्हाण वय २० रा. अकोला, वैष्णवी रमेश अवचार वय २४ रा. खामगाव, गजानन नामदेव यादव वय ५५ रा. अकोला, शैलेजा रवींद्र शिंदे वय ४२ रा. खामगांव, समृद्धी रवींद्र शिंदे वय १२ रा. खामगाव, ज्योती संजय गोसावी वय ३५ रा. नेर, कमेलश कैलास शर्मा वय ३७ रा. शेगाव व एक ३५ वर्षीय अनोळखी इसम हे जखमी झाले. यातील काही जखमीची प्रकृती गंभीर आहे.