नागपूर : वीज प्रवाह सोडून तीन बिबट्यांची शिकार करण्यात आल्याची घटना देवरी-आमगाव मार्गावरील बिसेन यांच्या राईस मिलला लागून असलेल्या जंगलात घडली. सोमवारी रात्री गावकऱ्यांना हे बिबट मृतावस्थेत आढळून आले. दरम्यान या प्रकाराची गावकऱ्यांमध्ये चर्चा सुरू झाली.

वडेगाव येथील काही गावकऱ्यांनी या घटनेची माहिती रात्री ९:३० वाजताच्या सुमारास वनखात्याला दिली. माहिती मिळताच वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. विद्युत प्रवाहाला स्पर्श झाल्याने तिन्ही बिबट्यांचा मृत्यू झाला असून हा प्रकार शिकारीच्या दृष्टीने केल्याचे प्राथमिक तपासात पुढे आले आहे. यासंदर्भात वनविभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनीसुद्धा या घटनेला दुजोरा दिला.

हेही वाचा – आभाळ कोरडेठाक! जून ते ऑगस्ट महिन्यापर्यंत देशभरात सरासरी आठ टक्के कमी पावसाची नोंद; कारण काय, वाचा…

हेही वाचा – कसा राहणार समृद्धीनंतरचा नागपूर-गोवा शक्तीपीठ महामार्ग? किती खर्च येणार? काय फायदा? जाणून घ्या

विशेष म्हणजे, मागील काही महिन्यांपासून देवरी व सालेकसा परिसरातील जंगलात शिकाऱ्यांची टोळी सक्रिय असल्याची चर्चा आहे. या प्रकरणात चारजणांना अटक करण्यात आली आहे.

Story img Loader