वाशीम  : सध्या कडक उन्हाळा असल्यामुळे सर्वत्र पाणीटंचाई उद्भवली आहे.  याची सर्वात मोठी झळ मुक्या प्राण्यांना सोसावी लागत आहे. रिसोड तालुक्यातील देऊळगाव बंडा येथे तीन रोही पाण्यासाठी भटकंती करीत असताना ३१ मे रोजी विहारीत पडून मृत्युमुखी पडले. जंगलात पाणीच नसल्याने वन्यप्राणी गाव, शेतशिवारात भटकंती करीत असल्याचे विदारक चित्र जिल्ह्यात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> “इंडिया आघाडीचे सरकार येणार आणि राहुल गांधी पंतप्रधान होणार,” विजय वडेट्टीवार यांचा विश्वास; म्हणाले…

रिसोड तालुक्यातील देऊळगाव बंडा शेतशिवारातील शेतकरी डॉ.संजाबराव लांबाडे यांच्या विहिरीमध्ये ३१ मे रोजी तीन रोही पडले.  यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. ही घटना ३१ मे रोजी दुपारी चारच्या सुमारास उघडकीस आली. वन विभागाचे अधिकारी यांनी पंचनामा करून विहिरीतील रोहींचे मृतदेह बाहेर काढले.

हेही वाचा >>> गांधीबाबत मोदींच्या विधानाकडे दुर्लक्ष, काँग्रेस नेत्यांनी दिली ही कारणे

प्राण्यांची काळजी कोण करणार ? वाशीम जिल्ह्यात जंगल परिसर बऱ्यापैकी आहे. यामध्ये विविध प्रजातीचे प्राणी आहेत. परंतु सध्या जंगलात पाण्याची सुविधा नसल्याने पाण्याच्या शोधात प्राणी गावाकडे धाव घेत आहेत. बहुतांश विहिरींना कठडे नसल्याने त्याचा अंदाज प्राण्यांना येत नसून विहिरीत पडून त्यांचा दुर्दैवी मृत्यू होत आहे. यापूर्वी देखील अशा घटना घडल्या आहेत. तरीही वन विभागाकडून आवश्यक त्या उपाययोजना अपयशी ठरत असून मुक्या प्राण्यांच्या जीवाची किंमत नाही का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Three nilgai dies after fell into well pbk 85 zws
Show comments