वारंवार सूचना व विनंती करूनही मालमत्ता करदाते कराचा भरणा करण्याकडे दुर्लक्ष करीत असल्याने गोंदिया नगर पालिकेच्याच्या कर विभागाने संबंधितांना नोटीस बजावून सोमवार, २७ फेब्रुवारीपासून प्रत्यक्ष कारवाईची सूचना दिली होती. त्यानुसार सोमवारी नगर पालिकेने शहरातील तीन मालमत्तांना सील ठोकले असून दोन शिकवणी वर्गांना नोटीस बजावली आहे. या कारवाईमुळे थकीत करदात्यांचे धाबे दणाणले आहे.
हेही वाचा- धक्कादायक..! देशभरातील ४७ बँकांची ३९ हजार कोटींनी फसवणूक
नगर परिषदेला मालमत्ता करातून मिळणाऱ्या उत्पन्नातून विविध विकास कामे केली जातात. मात्र, चालू आर्थिक वर्ष संपण्याकरिता आता केवळ १ महिन्याचा काळ उरला आहे. आतापर्यंत केवळ ३९ टक्के कर वसुली झाली असून कोट्यवधीची थकबाकी आहे. यंदा मालमत्ता कराची थकबाकी ३.४६ कोटी असून चालू मागणी ५.५२ कोटी एवढी आहे. मागणी व थकबाकी असे एकूण ८.९९ कोटींच्या वसुलीचे उद्दिष्ट कर विभागावर आहे. त्यात ३१ जानेवारीपर्यंत कर विभागाने ३.४३ कोटींची वसुली केली आहे. त्यामुळे नगर परिषदेचे कर वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्याकरिता थेट मैदानात उतरण्याचा निर्णय घेत थकीत करदात्यांना नोटीस बजावून व शहरात मुनादी देऊन सोमवारपासून थेट कारवाईची सूचना पोहचवली. त्यानुसार नगर परिषदेच्या कर विभागाने सोमवारी प्रत्यक्ष कारवाईला सुरुवात केली.
हेही वाचा- नागपूर : महामेट्रोचा आता लवकरच मनोरंजन पार्क; मुलांसाठी आगळी-वेगळी खेळणी असणार
शहरातील सूर्याटोला येथील शांता बेनीराम बोरकर यांच्यावर थकीत असलेल्या दोन लाख १ हजार रुपये करापोटी त्यांची मालमत्ता सील करुन ७ दिवसात कराचा भरणा न केल्यास मालमत्ता लिलाव करण्याची नोटीस बजावली आहे. तसेच सूर्याटोला व सिव्हिल लाईन परिसरातील दोन वाणिज्यिक दुकाने सील करण्यात आली आहेत. सोबतच मालमत्ता नोंद नसलेल्या शिकवणी वर्गांना कर मागणी नोटीस बजावण्यास सुरुवात केली असून सिद्धीविनायक व संतोष शिवकणी वर्गांना नोटीस बजावून ७ दिवसात मालमत्ता कर न भरल्यास जप्तीच्या कारवाईची सूचना देण्यात आली आहे.