बुलढाणा : लोणार तालुक्यातीलशिवणीजाट गावाजवळील नाल्याला आलेल्या पुरात तिघे वाहून गेले होते. यापैकी दोघे बचावले, मात्र तिस-याचा शोध लागला नव्हता. केशव धनराज बरले (५२), संतोष हरिभाऊ सरकटे (४६ ) असे बचावलेल्यांचे नाव आहे. समाधान श्रीराम सरकटे (४८) हे अजूनही बेपत्ता आहे. त्यांचा शोध घेण्यासाठी बचाव पथक आज सकाळी दाखल झाले. साडेदहाच्या आसपास घटनास्थळी दाखल पथकाने शोध मोहिम सुरू केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

काल झालेल्या मुसळधार पावसाने शिवणीजाट गावानजीकच्या नाल्याला पूर आला. दरम्यान संध्याकाळी शेतातून बैलगाडीसह जाणारे तिघेजण वाहून गेले. तहसीलदार पोलीस निरीक्षक विजयसिंग राजपूत, नायब तहसीलदार रामकीसन डोळे, सहायक पोलीस निरीक्षक शरद अहेर, पोलीस उपनिरीक्षक सूरज काळे, मंडळ अधिकारी डव्हळे, तलाठी अशोक सोदर, काशिनाथ इपर, विष्णू केंद्रे, मंदार तनपुरे, जमादार बन्सी पवार, कृष्णा निकम, संतोष चव्हाण, शिवछत्र मित्र मंडळाचे अध्यक्ष नंदकिशोर मापारी व सहकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी बेपत्ता झालेल्यांचा शोध घेण्याचा अयशस्वी प्रयत्न केला होता.