लोकसत्ता टीम

यवतमाळ : जिल्ह्यात गेल्या २४ तासांत घडलेल्या तीन विविध घटनांत तिघांचा बुडून मृत्यू झाला. यवतमाळ तालुक्यातील हिवरी येथे गणपती विसर्जनादरम्यान युवकाचा बुडून मृत्यू झाला तर दिग्रस आणि वणी तालुक्यात शेतशिवारात संशयास्पद स्थितीत दोघांचे मृतदेह आढळले.

st bus accident pune solapur
पुणे-सोलापूर महामार्गावर एसटी बसचा अपघात, महिलेसह दोघांचा मृत्यू; बसमधील ४० ते ५० प्रवासी जखमी
sharad pawar raj thackeray (1)
शरद पवारांचं राज ठाकरेंना आव्हान; जातीयवादाच्या टीकेवर म्हणाले,…
Sanjay Rathod case, death of young woman,
संजय राठोड प्रकरण : तरुणीचा मृत्यू अपघात किंवा आत्महत्या असल्याचा निष्कर्ष कशाच्या आधारे ? उच्च न्यायालयाचा सवाल
Pune Kalyani Nagar porsche accident case, trial
कल्याणीनगर अपघात प्रकरण : खटल्याच्या सुनावणीला लवकरच सुरुवात होण्याची शक्यता
Three killed in accident on Vashi khadi bridge navi Mumbai news
नवी मुंबई: भीषण अपघात तीन ठार
pune Sinhagad Road police arrested innkeeper along with his accomplice who was walking around with pistol
कुख्यात लिमन ऊर्फ मामा टोळीतील दोघे सराईत अटकेत, एक पिस्तूल, तीन काडतुसे जप्त
Three laborers died after a water tank collapsed in Pimpri Chinchwad
Pune Water Tank Collapse : पिंपरी- चिंचवडमध्ये पाण्याची टाकी कोसळून पाच कामगारांचा मृत्यू; ७ गंभीर जखमी
Bengaluru building collapse
Building Collapses: पत्त्यासारखी कोसळली इमारत; ५ जणांचा मृत्यू, अनेकजण अडकल्याची भीती, थरारक व्हिडीओ व्हायरल

गणपती विसर्जन करताना नदीत बुडून युवकाचा मृत्यू झाल्याची घटना हिवरी येथे शुक्रवारी सायंकाळी घडली. गोविंद दशरथ राऊत (२८) असे मृताचे नाव आहे. गणपती विसर्जनासाठी अनेकजण नदीत उतरले. मात्र, गोविंदला पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडाला. ते पाहून उपस्थित लोकांनी त्याचा शोध सुरू केला. जवळपास एक तासाच्या प्रयत्नानंतर तो आढळला. त्याला तातडीने यवतमाळ येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले. त्याच्या मागे आई, भाऊ, बहीण व मोठा आप्त परिवार आहे. यवतमाळ ग्रामीण पोलिसांनी या घटनेची नोंद घेऊन पुढील तपास सुरू केला.

आणखी वाचा-“महावितरणचा वीज बिल भरणा तत्काळ करा”, न्यायालयाचे गोंदिया जि.प. ला निर्देश, २४ ऑगस्टपासून पुरवठा बंद

वणी तालुक्यातील लाठी येथील एका ४४ वर्षीय इसमाचा उकणी शिवारातील शेततळ्यात मृतदेह आढळला. शंकर जनार्धन खारकर असे मृताचे नाव असून ते इंगल ओबी कंपनीमध्ये कामावर होते. उकणी शिवारात अजय बलकी यांचे शेत आहे. त्याच शेतात शेततळे आहे. शेततळ्यात मृतदेह असल्याची माहिती मिळाली. ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली.

तिसरी घटना दिग्रस तालुक्यातील विठोली येथे घडली. गावालगतच्या नदीवर पोहण्यासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांचा पाण्यात गुडून मृत्यू झाला. ही घटना शनिवारी दुपारी घडली. आदर्श संजय मुनेश्वर (१२) असे मृताचे नाव आहे. वडील नसल्यामुळे तो विठोली येथे आजी-आजोबाकडे राहत होता. तो पाचच्या वर्गात शिक्षण घेत होता. शनिवारी दुपारी गावातील काही मुलांसोबत आदर्श गावालगतच्या नदीवर पोहायला गेला होता. आदर्शला पोहताना पाण्याचा अंदाज आला नाही. त्यामुळे तो खोल पाण्यात जाऊन बुडाला. ही बाब काही मुलांच्या लक्षात आली. त्यांनी आरडाओरड केली आणि गावाकडे धाव घेतली. नंतर गावकऱ्यांनी घटनास्थळ गाठून नदीत आदर्शचा शोध घेतला. त्याचा मृतदेहच हाती लागला. आदर्शला त्वरित ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.