चंद्रपूर: चंद्रपूर – गडचिरोली मार्गावर व्याहाड खुर्द गावाजवळ दोन मोटर सायकल सामोरा समोर भिडल्या असता झालेल्या अपघातात तीन जण ठार तर तीन जण जखमी झाले. अपघाताची ही घटना शुक्रवारी रात्री दहा वाजताचे सुमारास घडली. मृतकांमध्ये हरीश पांडुरंग सहारे, सागर रघुनाथ शेडमाके व प्रशांत आत्राम यांचा समावेश आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सुमित शेडमाके, अजय गोरडवार आणि प्रशांत चावरे अशी गंभीर जखमींची नावे आहेत. या अपघाताची माहिती मिळताच सावली पोलिस तत्काळ घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर जखमींना तातडीने गडचिरोली जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Three persons died and three others injured in two motocyles accident in chandrapur rsj 74 dvr
Show comments