लोकसत्ता टीम
वर्धा: अवैध विविध व्यवसाय करणाऱ्या विरोधात कठोर कारवाई करण्याचा चंग पोलीस अधीक्षक नूरूल हसन यांनी बांधला. त्यासाठी विशेष गुन्हे शाखा स्थापन केली. मात्र याच शाखेतील काही भलत्याच कामाला लागल्याच्या तक्रारी सुरू झाल्या.
माहिती खरी ठरताच धीरज राठोड, राकेश इतवारे व पवन देशमुख यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे. या निलंबन काळात त्यांना मुख्यालयाशी सलग्न करण्यात आले आहे.या तिघांवर अवैध व्यावसायिकांकडून पैशाची मागणी केल्याचा आरोप आहे.तसेच आनंदनगर भागातील एकाकडून तीस हजार रुपये घेतल्याचे उघड झाले होते.
आणखी वाचा- किळसवाणे! प्रेयसीच्या मुलीवरच नराधमाचा बलात्कार
जिल्ह्यातील अवैध वाळू विक्रेते,अमली पदार्थ, दारूविक्री,सट्टा बेटिंग असे व्यवसाय कारनाऱ्यावर वचक बसविण्यासाठी अधीक्षकांनी क्राईम इंटीलिजेन्स युनिट या खास पथकाची स्थापना केली होती. या पथकाने धडाकेबाज कारवाई करीत दबदबाही निर्माण केला. मात्र याच पथकास पैशाचा मोह जडला. त्यात तिघे अडकले. या तिघांची चौकशी करण्यासाठी एका अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे.