अमरावती : अमेरिकेतील स्टॅनफोर्ड विद्यापीठाने जगातील २ टक्‍के प्रभावशाली शास्त्रज्ञांमध्ये भारतातील ३ हजारावर शास्‍त्रज्ञांना स्थान दिले असून संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्‍या तीन शास्त्रज्ञांचाही या यादीत समावेश आहे. स्टॅनफोर्ड विद्यापीठ दरवर्षी ही क्रमवारी जाहीर करते. अमरावती विद्यापीठातील जैवतंत्रज्ञान विभागाचे माजी विभागप्रमुख डॉ. महेंद्रकुमार रॉय यांच्‍यासह त्यांचे विद्यार्थी डॉ. अनिकेत गादे व डॉ. अविनाश इंगळे यांना हा बहुमान मिळाला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

डॉ. महेंद्रकुमार राय हे सध्‍या पोलंड येथे व्हिजिटींग प्रोफेसर म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या संशोधन कार्याची दखल घेत अमेरिकेच्या स्टेनफोर्ड विद्यापीठाने दोन टक्के शास्त्रज्ञांमध्ये मानांकन दिले आहे. डॉ. रॉय यांच्या यशाबद्दल विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले, प्र-कुलगुरू डॉ. प्रसाद वाडेगावकर व कुलसचिव डॉ. तुषार देशमुख यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

हेही वाचा : वर्धा : आश्रमशाळेतील मृत्यू अपघाती नव्हे तर खूनच, मित्राचा संताप भोवला

डॉ. महेंद्रकुमार रॉय यांनी त्यांच्या महत्वपूर्ण व नाविन्यपूर्ण कार्यामुळे वैज्ञानिक क्षेत्रात आपला ठसा उमटविला. त्‍यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठाच्या जैवतंत्रज्ञान विभागातील त्यांचे विद्यार्थी डॉ. अनिकेत गादे व डॉ. अविनाश इंगळे यांना सुद्धा प्रभावशाली दोन टक्के शास्त्रज्ञांच्या यादीत स्थान देण्यात आले आहे. डॉ. अनिकेत गादे हे सहयोगी प्राध्यापक म्हणून मुंबईतील रसायन तंत्रज्ञान संस्थेत येथे कार्यरत आहेत. त्यांनी रासायनिक तंत्रज्ञान आणि नवकल्पना प्रगत करण्याचे विविध पेटंट मिळविले आहेत. डॉ. अविनाश इंगळे हे अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात कार्यरत असून त्यांचे विविध शोधनिबंध प्रकाशित झाले आहेत.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Three researchers from sant gadgebaba amravati university named in stanford university 2 percent influential scientists list mma 73 css