चंद्रपूर : गडचिरोली – चंद्रपूर मार्गावरील सावली तालुक्यातील व्याहाड येथे वैनगंगा नदीच्या पात्रात चंद्रपुरातील कु. प्रतिमा प्रकाश मंडल (२३), कु. कविता प्रकाश मंडल (२१), कु. लिपिका प्रकाश मंडल (१८) या तीन बहिणी बुडल्याने खळबळ उडाली आहे. या तिन्ही बहिणींचा युध्दपातळीवर शोध घेतला जात आहे. एकूण पाच जण बुडाले होते. त्यापैकी दोन जणांना वाचविण्यात यश आले आहे तर तिघींचा शोध सुरू आहे. सदर घटना ही दुपारच्या सुमाराची आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चंद्रपूर शहरातील बाबुपेठ परिसरातील रहिवासी असलेले मंडल कुटूंबिय महाशिवरात्री निमित्त मार्कंडा येथे जाण्यासाठी निघाले होते.मात्र चंद्रपूर-गडचिरोली मार्गावरील सावली तालुक्यातील व्याहाड येथील वैनगंगा नदीच्या मोठ्या पुलाखाली आंघोळीसाठी उतरले असता खोल पाण्यात गेल्याने कु.लिपिका मंडल, कु.प्रतिमा मंडल व कु.कविता मंडल या वैनगंगेच्या पाण्यात बुडाल्या.

या तिघींनी पाण्यात बुडत असतांना आरडा ओरड केली. तेव्हा त्यांना वाचविण्यासाठी लोक धावले. मात्र खोल पाण्यात असल्याने त्यांना पाण्याच्या बाहेर काढता आले नाही. त्यांच्याच बाजूला असलेल्या दोघींना वैनगंगा नदीच्या पात्रातून बाहेर काढण्यात यश आले. मात्र या तिन्ही बहिणी खोल पाण्यात गेल्याने त्यांना बाहेर काढता आले नाही असे सांगण्यात येत आहे. या तिघींंचा युध्दपातळीवर शोध सुरू आहे. या तिघींचा शोध घेण्यासाठी या परिसरातील नावाड्यांना पाचारण करण्यात आले आहे तसेच पोलीसांना माहिती दिली आहे.मोटर बोट देखील मागविली असल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे या घटनेच्या वेळी अख्ये मंडल कुटूंब वैनगंगा नदीच्या काठावर होते. त्यांच्याच डोळ्यादेखील ही दुर्देवी घटना घडली.