नागपूर: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाचा एसटीच्या प्रवासी वाहतुकीला फटका बसत आहे. मंगळवारीही नागपूर विभागातील ३ हजार १२६ किलोमिटरची वाहतूक रद्द झाली. येथून मराठवाड्याकडे जाणाऱ्या फेऱ्या मध्येच संपत असल्याने प्रवाशांना मन:स्ताप होत आहे.
‘एसटी’च्या माहितीनुसार नागपूरहून पंढरपूरकडे निघालेल्या दोन बसेस पुसदलाच थांबवण्यात आल्या. मराठवाड्याकडे आंदोलक संतप्त असल्याने पुढे बस पाठवली गेली नाही. सोलापूरला निघालेली बस उमरखेडलाच थांबवली गेली. तर अंबेजोगाई निघालेली बस पुसदला तर छत्रपती संभाजीनगरकडे निघालेली बस अकोलामध्येच थांबवली गेली. त्यामुळे पुढच्या मार्गावरील फेरी रद्द केली गेली.
हेही वाचा… महात्मा फुले जनआरोग्य योजनेपासून दंतचे महागडे उपचार दूर; राज्यातील गरीब रुग्णांचा वाली कोण?
सलग तीन दिवसांपासून एसटीने छत्रपती संभाजीनगरला निघालेले प्रवासी अकोलामध्ये, पंढरपूरला निघालेले प्रवासी पुसदला, अंबेजोगाईला निघालेले प्रवासी पुसदला अडकून पडत आहेत.