नागपूर : नागपूर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पारा चढल्याने उकाडा वाढला आहे. त्यामुळे नागपूर महापालिकेच्या आरोग्य विभागाने उष्माघाताच्या ३ संशयित मृत्यूची नोंद केली आहे. परंतु, शवविच्छेदन अहवालानंतरच या मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होईल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

नागपूर जिल्ह्यात मध्यंतरी सातत्याने अधून- मधून पाऊस, ढगाळ वातावरण, उन्हाचा खेळ सुरू होता. त्यामुळे तापमानही कमी होते. परंतु गेल्या काही दिवसांपासून सातत्याने तसपमान ४२ ते ४४ अंश सेल्सियस दरम्यान आहे. उकाड्यामुळे नागरिक त्रस्त आहेत. सर्वत्र तापासह गॅस्ट्रो, अतिसार यासह उन्हामुळे होणाऱ्या विविध आजारांचे रुग्ण वाढले आहे.

हेही वाचा >>> भंडारा : नवेगाव-नागझिरा अभयारण्यातील वाघांना उद्या दोन नव्या ‘मैत्रिणी’ भेटणार!

 नागपूरच्या मेडिकल, मेयो, आयसोलेशन या शासकीय- महापालिका आणि सर्व खासगी रुग्णालयांत गेल्या काही दिवसांत ओकारी, हगवण, तापासह इतर उष्माघात सदृश्य लक्षणाचे रुग्ण वाढले आहे. दरम्यान महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे १९ मे पर्यंत ३ उष्माघाताच्या संशयित मृत्यूची नोंद झाली. त्यापैकी २ अनोळखी रुग्ण असून एका रुग्णाची माहिती आरोग्य विभाग काढत आहे. या सर्वांच्या शवविच्छेदन अहवालावरूनचा त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल.