लोकसत्ता टीम
गोंदिया : सालेकसा तालुक्यातील भजेपार माताटोला येथे शेतशिवारातून गावात शिरलेल्या रानडुक्कराने अचानक हल्ला चढवत तीन लोकांना जखमी केले. ही घटना मंगळवार २९ ऑगस्ट रोजी सायंकाळी ८ वाजताच्या सुमारास माताटोला येथे घडली. जखमी झालेल्या व्यक्तींची नावे रमेश महारवाडे ( वय ५०), ओमप्रकाश चुटे (वय ३५) आणि मधुकर बहेकार (वय ५१) सर्व रा. माताटोला, भजेपार अशी आहेत.
हल्ल्यानंतर लगेच त्या तिघांवर प्रथमत: प्राथमिक आरोग्य केंद्र सातगाव ( साखरीटोला) आणि त्या नंतर ग्रामीण रुग्णालय आमगाव येथे उपचार करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. दरम्यान जवळपास दीड तास एका घरात दबा धरून बसलेल्या रानडूकराने शेत शिवाराकडे पळ काढला. घटनेचा पंचनामा करण्यात आला असून वन विभागाने जखमींना तत्काळ नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे.
सालेकसा तालुक्यातील भजेपार माताटोला येथे शेतशिवरातून गावात शिरलेल्या रानडूकराने अचानक हल्ला चढवत तीन लोकांना जखमी केले. ही घटना मंगळवार २९ ऑगस्ट रोजी सायंकाळी ८ वाजताच्या सुमारास माताटोला येथे घडली. जखमी झालेल्या व्यक्तींची नावे रमेश महारवाडे ( वय ५०), ओमप्रकाश चुटे (वय ३५) आणि मधुकर बहेकार (वय ५१) सर्व रा. माताटोला, भजेपार अशी आहेत. हल्ल्यानंतर लगेच त्या तिघांवर प्रथमत: प्राथमिक आरोग्य केंद्र सातगाव ( साखरीटोला) आणि त्या नंतर ग्रामीण रुग्णालय आमगाव येथे उपचार करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. दरम्यान, जवळपास दीड तास एका घरात दबा धरून बसलेल्या रानडूकराने शेत शिवाराकडे पळ काढला. घटनेचा पंचनामा करण्यात आला असून वन विभागाने जखमींना तत्काळ नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे.