लोकसत्ता टीम
हिंगणा: एमआयडीसीमधील कटारिया एग्रो कंपनीला आग लागून तीन कामगारांचा होरपळून मृत्यू झाला असून तिघे जखमी झाले आहेत, उपमुख्यमंत्री व नागपूरचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेबाबत दुख व्यक्त केले आहे.
हिंगणा एमआयडीसीतील सोनेगाव निपाणी येथे कटारिया अॅग्रो प्रा. लि. या कंपनीत आग लागली, सिलिंडरचा स्फोट झाल्याने ही आग लागल्याची माहिती आहे. यात ३ कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तीन कामगार आतमध्ये अडकल्याची माहिती आहे. नागपूर महापालिकेसह इतर पालिकांचे बंब आग विझविण्यासाठी गेले आहेत.
दरम्यान घटनेबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने नागपूरच्या जिल्हाधिकार्यांना याबाबत समन्वय साधण्यास सांगितले असून, आता आग नियंत्रणात आहे. या घटनेत 3 कामगार जखमी झाले असून, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेतील जखमींना तातडीने चांगले उपचार मिळावेत, असे निर्देशही देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. जिल्हाधिकारी मुंबई येथे बैठकीत असले तरी ते सातत्याने समन्वय साधून आहेत. तहसिलदार हे तातडीने घटनास्थळी पोहोचत आहेत.